सबळ पुरावा हातात आल्यावर संशयितांना अटक जिल्हा बॅँक प्रकरण : अटकपूर्व मिळवण्यासाठी हालचाली

By admin | Published: April 21, 2016 11:30 PM2016-04-21T23:30:53+5:302016-04-21T23:30:53+5:30

जळगाव : जे.टी.महाजन सूतगिरणी (यावल) खरेदी प्रकरणात दाखल गुन्‘ात पुरावे गोळा करण्याचे काम सुरूअसून सबळ पुरावा हातात आल्यावर संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल किंवा आवश्यक वाटले तर अटकही करण्यात येईल, अशी माहिती तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर यांनी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

District bank case: Movement to get anticipated | सबळ पुरावा हातात आल्यावर संशयितांना अटक जिल्हा बॅँक प्रकरण : अटकपूर्व मिळवण्यासाठी हालचाली

सबळ पुरावा हातात आल्यावर संशयितांना अटक जिल्हा बॅँक प्रकरण : अटकपूर्व मिळवण्यासाठी हालचाली

Next
गाव : जे.टी.महाजन सूतगिरणी (यावल) खरेदी प्रकरणात दाखल गुन्‘ात पुरावे गोळा करण्याचे काम सुरूअसून सबळ पुरावा हातात आल्यावर संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल किंवा आवश्यक वाटले तर अटकही करण्यात येईल, अशी माहिती तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर यांनी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
लक्ष्मी टेक्सटाईल्सला (धरणगाव) निविदेद्वारे भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम नियमबा‘ परत करून जिल्हा बॅँकेची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी बॅँकेचे तत्कालीन चेअरमन व विद्यमान आमदार सतीश भास्करराव पाटील, सूतगिरणीवर बॅँकेचे प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील, जळगाव बाजार समितीचे सभापती प्रकाश आनंदा नारखेडे, संचालक लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर, धरणगावचे नगराध्यक्ष सुरेश सीताराम चौधरी, अनिल बन्सीलाल सोमाणी, नयनकुमार चिमणलाल सराफ व भिकन काशीनाथ माळी आदी आठ जणांविरुध्द ॲड.विजय भास्कर पाटील यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्‘ाशी निगडित काही फाईली व कागदपत्रे मागवली जाणार आहेत. दरम्यान, या गुन्‘ात अजामीनपात्र कलमे लावण्यात आली असल्याने संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Web Title: District bank case: Movement to get anticipated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.