जिल्हा बँकेची ९३० कोटींची थकबाकी ३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत : सचिवांमार्फत दिली थकबाकीदारांना नोटीस

By admin | Published: October 18, 2016 12:37 AM2016-10-18T00:37:57+5:302016-10-18T00:37:57+5:30

जळगाव : दुष्काळीस्थिती, शासनाकडून कर्जवसुलीला बंदी या कारणांमुळे जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचा वेग कमी झाला आहे. जिल्हा बँकेचे तब्बल ९३० कोटींचे कर्ज थकीत असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकीदारांनी कर्जाची रक्कम भरावी या आशयाची नोटीस सचिवांमार्फत कर्जदारांना देण्यात आली आहे.

District Bank's outstanding dues of Rs 930 crore till 30th November: Notice to the dues of the Secretaries | जिल्हा बँकेची ९३० कोटींची थकबाकी ३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत : सचिवांमार्फत दिली थकबाकीदारांना नोटीस

जिल्हा बँकेची ९३० कोटींची थकबाकी ३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत : सचिवांमार्फत दिली थकबाकीदारांना नोटीस

Next
गाव : दुष्काळीस्थिती, शासनाकडून कर्जवसुलीला बंदी या कारणांमुळे जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचा वेग कमी झाला आहे. जिल्हा बँकेचे तब्बल ९३० कोटींचे कर्ज थकीत असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकीदारांनी कर्जाची रक्कम भरावी या आशयाची नोटीस सचिवांमार्फत कर्जदारांना देण्यात आली आहे.
तीन वर्षात वसुलीत २३.२७ टक्के घट
शेतकर्‍यांची बँक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत खरीप व रब्बी हंगामात अल्प, मध्यम मुदतीचे पीककर्ज,पगारदार कर्मचारी, स्वयंसाहाय्यता बचत गट, जॉईंट लायबिलीट ग्रुप यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. सन २०१३/१४ मध्ये १५०५ कोटी ४६ लाखांची सन २०१४/१५ मध्ये १७३६ कोटी २७ लाख तर सन २०१५/१६ मध्ये १९४१ कोटी ६४ लाखांची रक्कमेच्या कर्जाची वसुलीस पात्र होती. त्यापैकी २०१३/१४ मध्ये ७९.२९ टक्के, २०१४/१५ मध्ये ७१.२९ तर २०१५/१६ मध्ये ४८.०२ टक्के वसुली झाली आहे. या तीन वर्षांमध्ये कर्जवसुलीत तब्बल २३.२७ टक्क्यांची घट झाली आहे.
सचिवांमार्फत दिली नोटीस
थकबाकीची रक्कम वाढत असल्याने जिल्हा बँकेने आता कर्जवसुलीला वेग दिला आहे. थकित कर्जाचा भरणा करण्यासाठी जिल्हा बँक तसेच विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांमार्फत कर्जदारांना नोटीस देण्यात आली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत
कर्जदारांनी थकित रकमेचा भरणा तत्काळ करावा यासाठी जिल्हा बँकेने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत थकबाकी भरून नवीन कर्जासाठी पात्र व्हावे असे आवाहन केले आहे. ३० नोव्हेंबरनंतर थकित कर्जदारांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
धरणगाव, रावेर,भडगाव तालुक्यात सर्वाधिक थकबाकी
धरणगाव तालुक्यातील कर्जाच्या वसुलीत तब्बल ५४.४७ टक्के घट झाली आहे. त्या पाठोपाठ रावेर तालुक्यात ४२.३६ तर भडगाव तालुक्यात ४१.४० टक्के कर्जवसुलीत घट झाली आहे.


कोट
गेल्या वर्षी असलेली दुष्काळीस्थिती, शासनाने कर्जवसुलीला केलेली बंदी यामुळे कर्जाची थकबाकी ही ९३० कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. कर्जदारांनी थकबाकीची रक्कम भरून नवीन कर्जासाठी पात्र व्हावे.
जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा बँक.

Web Title: District Bank's outstanding dues of Rs 930 crore till 30th November: Notice to the dues of the Secretaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.