नशिराबादला वाघूर धरणाच्या विहिरीतून पाणी मिळण्याची मागणी जिल्हाधिकारींना निवेदन : अन्यथा प्रशासनासमोर उपोषण

By admin | Published: July 27, 2016 10:10 PM2016-07-27T22:10:16+5:302016-07-27T22:10:16+5:30

नशिराबाद : येथे गेल्या २५ ये ३० वर्षांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहे. कायमस्वरूपी ठोस पर्यायी योजनाच नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यावर मात करण्यासाठी व कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभागाच्या वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना बुधवार दि.२७ जुलैरोजी निवेदन देण्यात आले. दहा दिवसात याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हा प्रशासनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच खिलचंद रोटे यांनी निवेदनात नमूद केला आहे.

District Collector asked to get water from Waghur dam well: Nishihad | नशिराबादला वाघूर धरणाच्या विहिरीतून पाणी मिळण्याची मागणी जिल्हाधिकारींना निवेदन : अन्यथा प्रशासनासमोर उपोषण

नशिराबादला वाघूर धरणाच्या विहिरीतून पाणी मिळण्याची मागणी जिल्हाधिकारींना निवेदन : अन्यथा प्रशासनासमोर उपोषण

Next
िराबाद : येथे गेल्या २५ ये ३० वर्षांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहे. कायमस्वरूपी ठोस पर्यायी योजनाच नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यावर मात करण्यासाठी व कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभागाच्या वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना बुधवार दि.२७ जुलैरोजी निवेदन देण्यात आले. दहा दिवसात याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हा प्रशासनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच खिलचंद रोटे यांनी निवेदनात नमूद केला आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभाग व वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला. याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, सदर विहिरींची आवक चाचणी करण्यात आली असून मुबलक पाणी असल्याचा अहवाल सहाय्यक भूवैज्ञानिक ग्रामीण पुरवठा जिल्हा परिषद यांनी दिला आहे. वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सदर प्रकल्पासाठी लागणारा खर्च ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगांतर्गत स्वत: करण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पाणीटंचाई मुक्त होऊन शुद्ध व मुबलक पाणी ग्रामस्थांना मिळणार आहे. सदरचा पाणीपुरवठा गुरुत्वबलाद्वारे करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होणार आहे. विजेसाठी होणारा खर्च इतरत्र विकास कामांवर करता येणे शक्य होईल.
प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घ्यावी अन्यथा ८ ते १० दिवसानंतर प्रशासनासमोर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.

सरपंच खिलचंद रोटे, दगडू माळी, धनंजय चौधरी, ललित बर्‍हाटे, राहुल नारखेडे, किशोर बोंडे आदींनी जिल्हाधिकारींना निवेदन दिले त्यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक यांनाही माहितीस्तव निवेदन पाठविण्यात आले आहे.

Web Title: District Collector asked to get water from Waghur dam well: Nishihad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.