आयुक्तांच्या निवासस्थानासाठी जागेवर शिक्कामोर्तब जिल्हाधिकार्यांची मंजुरी; साफसफाईला सुरुवात
By Admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:40+5:302015-10-03T00:20:40+5:30
अकोला: महापालिकेच्या आयुक्त पदावरील अधिकार्यांना राहण्यासाठी हक्काचे निवासस्थान आजपर्यंतही उपलब्ध नव्हते. शुक्रवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आयुक्तांसाठी निवासस्थानाच्या जागेवर शिक्कामोर्तब केले. रामदासपेठस्थित क्रीडा संकुलच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवर निवासस्थान उभारण्याला जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिली. मनपाने या जागेवर साफसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.
अ ोला: महापालिकेच्या आयुक्त पदावरील अधिकार्यांना राहण्यासाठी हक्काचे निवासस्थान आजपर्यंतही उपलब्ध नव्हते. शुक्रवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आयुक्तांसाठी निवासस्थानाच्या जागेवर शिक्कामोर्तब केले. रामदासपेठस्थित क्रीडा संकुलच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवर निवासस्थान उभारण्याला जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिली. मनपाने या जागेवर साफसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेल्या वरिष्ठ अधिकार्यांना राहण्यासाठी खदान पोलीस ठाण्यासमोर इमारत उभारण्यात आली. सद्यस्थितीत चिंचोळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या या इमारतीमध्ये शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांच्यासह प्रभारी लेखाधिकारी अरुण पाचपोर, विधी विभागप्रमुख श्याम ठाकूर यांचा निवास आहे. १ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या स्थापनेला चौदा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला; परंतु या चौदा वर्षांच्या कालावधीत मनपा आयुक्तांना निवास करण्यासाठी अद्यापही हक्काची जागा उपलब्ध नसल्याचे दुर्दैव आहे. परिणामी तत्कालीन आयुक्त डॉ.विपीनकुमार शर्मा, दीपक चौधरी, डॉ.महेंद्र कल्याणकर, अजय लहाने यांना भाडेतत्त्वावर बंगला घेऊन राहण्याची वेळ आली. या बदल्यात संबंधित मालमत्ताधारकाला महिन्याकाठी भाडे द्यावे लागते. ही खर्चिक बाब लक्षात घेता, आयुक्तांना हक्काची जागा उपलब्ध असावी, या उद्देशातून आयुक्त अजय लहाने यांना जिल्हाधिकार्यांनी जागा शोधण्याचे निर्देश दिले. मनपा प्रशासनाने जागेसाठी बरीच शोधाशोध केली. जागेसंदर्भात आयुक्त लहाने जिल्हाधिकार्यांसोबत चर्चा करीत असताना उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनीदेखील काही जागा सुचवल्या. यामध्ये रामदासपेठस्थित क्रीडा संकुलच्या बाजूला शासकीय जागेला पसंती दर्शविण्यात आली.बॉक्स...सकाळी झाले शिक्कामोर्तबजिल्हाधिकारी जी.श्रीकांत, आयुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सकाळी १० वाजता संबंधित जागेची पाहणी केली. सुमारे ४० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सायंकाळी महापौर उज्ज्वला देशमुख यांनीदेखील या जागेची पाहणी केली.कोट...आयुक्त पदावरील अधिकार्यांना निवासस्थान नसल्यामुळे भाडेतत्त्वावर इमारत घ्यावी लागते. याबदल्यात संबंधित मालमत्ताधारकाला वर्षाकाठी ३ लाख रुपये भाडे द्यावे लागते. आजपर्यंत दिलेल्या भाड्याच्या रकमेत मनपाच्या हक्काच्या वास्तूचे निर्माण झाले असते. -अजय लहाने, आयुक्त मनपा