जिल्हाधिकार्यांनी घेतली आढवा बैठक, १५ एप्रील पर्यंत कामे पूर्ण करण्याची हमी
By admin | Published: March 1, 2015 10:10 PM2015-03-01T22:10:06+5:302015-03-01T23:12:56+5:30
त्र्यंबकेश्वर : नाशिकचे जिल्हाधिकारी दिपेद्रसिंग कुशवाहा यांनी शनिवारी वरीष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन संपूर्ण यंत्रणांचा आढावा घेतला.
त्र्यंबकेश्वर : नाशिकचे जिल्हाधिकारी दिपेद्रसिंग कुशवाहा यांनी शनिवारी वरीष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन संपूर्ण यंत्रणांचा आढावा घेतला.
वाहनतळ, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, टेलिफोन, विद्युत वितरण, सा. बां. विभाग, वनविभाग, म. जी.पा. आदी विभागांच्या उपसंचालक, अधिक्षक अभियंता, कार्य. अभियंता, उपवन व संरक्षक आदी हुद्द्यांच्या अधिकार्यांच्या बैठका घेऊन वेळेचे बंधन त्यांच्याकडून वदवून घेतले. नव्हे, लेखी मुदत ३१ मार्च आणि फार झाले तर १५ एप्रिल पर्यंत काम पूर्ण होईल व दर्जेदार होईल अशी लेखी हमीच जणू लिहून घेतली.
बंद असलेल्या दाराआड ही आढावा बैठक घेतली. या बैठकीला फक्त अधिकारी आणि मोजके लोक जिल्हाधिक्रायंच्यासह बसलेले होते. स्थानिक अधिकारी बाहेर थांबलेले होते.
१२.३० ला बैठक सुरू झाली व ६.३० ला संपली. त्यानंतर पावसामुळे जिल्हाधिकारी नाशिकला निघून गेले. त्र्यंबक शहरात आलेच नाहीत. (प्रतिनिधी)
----