जिल्हा न्यायालयातील वकील सोसायटीच्या निवडणुकीत दुरंगी लढत
By admin | Published: September 3, 2015 11:52 PM2015-09-03T23:52:32+5:302015-09-03T23:52:32+5:30
नाशिक : नाशिक जिल्हा ॲडव्होकेट मल्टीपर्पज सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १३ संचालकांसाठी परिवर्तन पॅनल व आपला पॅनल अशी दुरंगी लढत होणार आहे़ १५ सप्टेंबरला यासाठी मतदान होणार असून, यामध्ये जिल्ातील २००४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे़ दरम्यान, गुरुवारी (दि़३) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण गटातील सात , इतर मागास वर्ग गटातून पाच व महिला गळातून एक अशा १३ उमेदवारांनी माघार घेतली़
Next
न शिक : नाशिक जिल्हा ॲडव्होकेट मल्टीपर्पज सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १३ संचालकांसाठी परिवर्तन पॅनल व आपला पॅनल अशी दुरंगी लढत होणार आहे़ १५ सप्टेंबरला यासाठी मतदान होणार असून, यामध्ये जिल्ातील २००४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे़ दरम्यान, गुरुवारी (दि़३) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण गटातील सात , इतर मागास वर्ग गटातून पाच व महिला गळातून एक अशा १३ उमेदवारांनी माघार घेतली़ॲड़शिवाजी जाधव, ॲड़सीताराम जाधव, ॲड़चंद्रकांत येवले, ॲड़अरुण माळोदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले असून, ते मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत़, तर ॲड़प्रभाकर खराटे यांच्या नेतृत्वाखाली आपला पॅनल निवडणूक रिंगणात उतरले असून, ते रोडरोलर या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत़ दोन्ही पॅनलतर्फे शुक्रवारी (दि़४) निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे़या निवडणुकीसाठी जिल्हा न्यायालय, नाशिकरोड न्यायालय यांसह तालुका न्यायालयातील सुमारे २००४ मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत़ येत्या १५ सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे़(प्रतिनिधी)