अंजली दमानिया यांच्या मुलाखतीची व्हिडिओ सीडी न्यायालयात दाखल जिल्हा न्यायालय : एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याचे प्रकरण
By admin | Published: July 12, 2016 12:09 AM2016-07-12T00:09:34+5:302016-07-12T00:09:34+5:30
जळगाव : भारतीय जनता पक्षासह राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल आहे. या प्रकरणात सोमवारी फिर्यादीने वकिलामार्फत दमानिया यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची व्हिडिओ सीडी, संभाषण असलेला पेनड्राइव्ह, संभाषणाची हस्तलिखित प्रत तसेच संगणक तज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र न्यायालयात दाखल केले.
Next
ज गाव : भारतीय जनता पक्षासह राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल आहे. या प्रकरणात सोमवारी फिर्यादीने वकिलामार्फत दमानिया यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची व्हिडिओ सीडी, संभाषण असलेला पेनड्राइव्ह, संभाषणाची हस्तलिखित प्रत तसेच संगणक तज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र न्यायालयात दाखल केले.भाजप जळगाव महानगर अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष इरफान मोहंमद फते मोहंमद (४०, रा.भिलपुरा मशिदीजवळ, शनिपेठ, जळगाव) यांनी दमानिया यांच्याविरुद्ध न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. दमानिया यांना समन्स बजवावे किंवा नाही, यावर सोमवारी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात कामकाज झाले. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ ऑगस्टला होणार आहे. इरफान मोहंमद यांच्यावतीने ॲड.व्ही.एच. पाटील, ॲड.हारूल देवरे हे कामकाज पाहत आहेत.कागदपत्रे सादर करण्याचे आदेशदाऊद संभाषण प्रकरणामुळे एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी जितेंद्र मराठे (रा.जळगाव) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सोमवारी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यात न्यायालयाने,मनीष भंगाळे याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशनची कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी १६ ऑगस्टला होणार आहे.