जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा : राष्ट्रवादीची मागणी
By admin | Published: August 31, 2015 09:30 PM2015-08-31T21:30:30+5:302015-08-31T21:30:30+5:30
नाशिक : जिल्ात पावसाने दडी मारल्याने टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा व त्यासंदर्भात योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
Next
न शिक : जिल्ात पावसाने दडी मारल्याने टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा व त्यासंदर्भात योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ात पावसाची उघडीप आहे. तसेच जिल्ातील धरणाच्या पाण्याने तळ गाठले आहे. तसेच पावसाअभावी खरिपाच्या पेरण्यांवर दुबार पेरण्यांचे संकट आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा यांसारख्या पर्जन्य छायेच्या तालुक्यांमध्ये ६०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असताना यावर्षी तेथेही जेमतेमच पाऊस झाला आहे. तसेच सिन्नर, येवला, नांदगाव तालुक्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असून, टॅँकर भरण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. अशी भयंकर परिस्थिती नाशिक जिल्ाची असून, त्यामुळे जिल्हाभर टंचाई परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येऊन शासनाकडून वेळीच योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पूर्व विधानसभा अध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, सुरेश खेताडे, रामराव पाटील, नंदाताई राऊत. गणेश धोत्रे, नासिर पठाण, मालन पगारे सविता मोरे, श्यामसिंग परदेशी, विनोद भडांगे, गणेश पालवे, स्वप्नील दुसाणे, केशव बोरसे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)