जिल्हा वकील संघातर्फे लायब्ररीचा शुभारंभ सुविधा : लॉयर्स कंझुमर सोसायटीतर्फे ई-कोर्ट फी उपक्रम
By admin | Published: October 30, 2016 10:47 PM2016-10-30T22:47:06+5:302016-10-30T22:47:06+5:30
जळगाव : जळगाव जिल्हा वकील संघातर्फे नुतनीकरण झालेल्या बार रूममध्ये लायब्ररीचा शुभारंभ करण्यात आला. तर जिल्हा लॉयर्स कंझुमर को.ऑप सोसायटीतर्फे वकिलांसाठी ई-लायब्ररी व ई-कोर्ट फी स्टॅम्पची सुविधेचा नुकताचा शुभारंभ झाला.
Next
ज गाव : जळगाव जिल्हा वकील संघातर्फे नुतनीकरण झालेल्या बार रूममध्ये लायब्ररीचा शुभारंभ करण्यात आला. तर जिल्हा लॉयर्स कंझुमर को.ऑप सोसायटीतर्फे वकिलांसाठी ई-लायब्ररी व ई-कोर्ट फी स्टॅम्पची सुविधेचा नुकताचा शुभारंभ झाला.जिल्हा वकील संघातर्फे लायब्ररीजिल्हा वकील संघातर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए.लव्हेकर यांच्या हस्ते लायब्ररीचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र व गोवा वकील संघाचे ॲड.विपीन बेंडाळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या भारतीय राज्य घटनेचे पुस्तके लायब्ररीच्या पुस्तकात समाविष्ठ करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल, न्या.ज्योती दरेकर, न्या.के.पी.नांदेडकर, न्या.ए.के.पटणी, न्या.चित्रा हंकारे, न्या.कटारे, न्या.एस.के.कुलकर्णी, न्या.आर.एम.मिश्रा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मण वाणी, ॲड.विपीन बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड.स्वाती निकम, मानद सचिव ॲड.गोविंद तिवारी, ॲड.रुपाली भोकरीकर, कोषाध्यक्ष ॲड.राहुल झंवर, ॲड.सचिन चव्हाण, ॲड.विरेंद्र पाटील, ॲड.मनोज पाटील, ॲड.संतोष सांगोळकर, ॲड.अशोक महाजन, ॲड.अजित वाघ, ॲड.विसपुते, ॲड.फिरोज पटेल, ॲड.श्रद्धा काबरा उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सचिव ॲड.गोविंद तिवारी यांनी तर आभार ॲड.रुपाली भोकरीकर यांनी मानले.जिल्हा लॉयर्स कंझुमर को.ऑप सोसायटीजिल्हा लॉयर्स कंझुमर को.ऑप.सोसायटीतर्फे वकील बांधवांसाठी जिल्हा न्यायालयातील सोसायटीच्या कार्यालयात ई-लायब्ररीचा शुभारंभ ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.व्ही.आर.वाणी, ॲड.भरत देशमुख, सोसायटीचे अध्यक्ष ॲड.संजय राणे यांच्या हस्ते झाले.यावेळी कंझुमर सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड.व्ही.आर.घोलप, ॲड.अकिल ईस्माईल, सचिव ॲड.प्रवीण झंवर, जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके, ॲड.आनंद मुजुमदार, ॲड.सागर चित्रे, ॲड.जी.एम.पाटील, ॲड.आर.के.पाटील, ॲड.कुणाल पवार, ॲड.हेमंत भंगाळे उपस्थित होते. सोसायटीच्या माध्यमातून न्यायालयात लागणारे कोर्ट फी स्टॅम्प उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लायब्ररीसाठी लागणारे संगणक व प्रिंटर माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून दिल्याने अध्यक्ष ॲड.संजय राणे यांनी आभार मानले.१) फोटो कॅप्शन : जिल्हा वकील संघाच्या लायब्ररीचे उद्घाटन भारतीय संविधानाचे पुस्तक लायब्ररीत समाविष्ट करून करतांना न्या.एम.ए.लव्हेकर,ॲड.विपीन बेंडाळे, ॲड.लक्ष्मण वाणी, ॲड.स्वाती निकम, ॲड.गोविंद तिवारी. (फोटो : २७ सीटीआर ९७)फोटो कॅप्शन : २) जिल्हा लॉयर्स कंझुमर सोसायटीच्या ई-लायब्ररीचा शुभारंभ करताना ॲड.व्ही.आर.वाणी, ॲड.भरत देशमुख, ॲड.संजय राणे, ॲड.केतन ढाके, ॲड.अकिल ईस्माईल.