जि.प.ची सदस्यसंख्या वाढणार लोकसंख्या वाढीनुसार नवी रचना : आगामी निवडणुकीत जळगाव तालुक्यात असतील सहा गट
By admin | Published: March 30, 2016 10:21 PM2016-03-30T22:21:28+5:302016-03-30T22:21:28+5:30
जळगाव- जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. लोकसंख्या वाढ झालेली असल्याने जि.प.चे गट व पं.स.चे गणही वाढतील. अर्थातच जि.प. व पं.स.च्या सदस्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. जळगाव तालुक्यात एक जि.प. गट वाढून एकूण सहा गट असतील, अशी माहिती आहे.
Next
ज गाव- जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. लोकसंख्या वाढ झालेली असल्याने जि.प.चे गट व पं.स.चे गणही वाढतील. अर्थातच जि.प. व पं.स.च्या सदस्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. जळगाव तालुक्यात एक जि.प. गट वाढून एकूण सहा गट असतील, अशी माहिती आहे. जि.प.तील गटांची माहिती, सदस्यसंख्या आदी मुद्दे निवडणूक शाखेने नुकतेच मागीतले आहेत. या वृत्तास प्रशासनाने दुजोरा दिला आहे. परंतु जि.प.ची सदस्यसंख्या नेमकी किती वाढेल हे अजून जि.प.च्या प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. निवडणूक विभागातर्फे यासंबंधी सर्व कार्यवाही होणार आहे. जि.प.चे सध्या ६८ सदस्य आहेत. या सदस्यसंख्येत पुढील पंचवार्षिकमध्ये निश्चित वाढ होईल हे मात्र स्पष्ट झाले आहे. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी जि.प.त नूतन पदाधिकार्यांची निवड करावी लागणार आहे. गट पुनर्रचनेच्या शक्यतेने सदस्यही संभ्रमात२०११ च्या जनगणनेनुसार जि.प.ची आगामी निवढणूक होणार असल्याने बहुसंख्य जि.प. गटांची पुनर्रचना होऊ शकते. यामुळे आपल्या सध्याच्या गटात किती गावे असतील, किती मतदार असतील, कुठली गावे वगळली जातील यासंबंधी सदस्यांमध्ये चर्चा आहेे. यामुळे पुढील निवडणुकीत काय आखाडे बांधावेत यासंबंधी सदस्यांमध्येही संभ्रम, अनिश्चितता आहे. ३२ हजार मतदारांचा एक गटजि.प.च्या एका गटात ३२ मतदारांचा एक गट असेल, असे जि.प.तून सांगण्यात आले. ज्या मतदारसंघात सध्या यापेक्षा अधिक मतदार आहेत त्या गटांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. जळगावात शिरसोली-चिंचोली सर्वात मोठा गटजळगाव तालुक्यात शिरसोली चिंचोली सर्वात मोठा गट आहे. या गटात ४५ हजार मतदार आहेत. तर आसोदा-ममुराबाद हा सर्वात लहान गट असून, त्यात ३३ हजार मतदार आहेत. याचा अर्थ शिरसोली गटाची पुनर्रचना होईल. नशिराबाद -भादली गटातील काही गावे व शिरसोली चिंचोली गटातील काही गावे मिळून नवीन गट निर्माण होऊ शकतो. सध्या जळगाव तालुक्यात पाच जि.प.सदस्य म्हणजेच जि.प.चे पाच गट आहेत. त्यात शिरसोली -चिंचोली, म्हसावद-बोरनार, नशिराबाद-भादली, आसोदा-ममुराबाद, कानळदा-भोकर या गटांचा समावेश आहे. तर १० पं.स.चे सदस्य आहेत. नवीन एक गट व दोन पं.स.चे गण तयार झाल्यास सहा जि.प.सदस्य असतील तसेच पं.स.चे १२ सदस्य राहतील.