१०१ जि.प.शाळा अ श्रेणीत जि.प. शिक्षण समितीची सभा : १८४९ प्राथमिक शाळांना जलशुद्धीकरण यंत्र देण्याचा प्रस्ताव
By admin | Published: March 23, 2016 12:09 AM2016-03-23T00:09:47+5:302016-03-23T00:09:47+5:30
जळगाव- जिल्हा परिषदेच्या ठिकठिकाणच्या १०१ प्राथमिक शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. महिनाभरात ही संख्या २४ ने वाढली आहे. तसेच जि.प.च्या सर्व १८४९ शाळांना जलशुद्धीकरण यंत्र (आरओ) देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जि.प. शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी देण्यात आली.
Next
ज गाव- जिल्हा परिषदेच्या ठिकठिकाणच्या १०१ प्राथमिक शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. महिनाभरात ही संख्या २४ ने वाढली आहे. तसेच जि.प.च्या सर्व १८४९ शाळांना जलशुद्धीकरण यंत्र (आरओ) देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जि.प. शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी देण्यात आली. सभापती सुरेश धनके यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ही सभा झाली. सदस्य लीलाबाई सोनववणे, जयश्री महाजन, प्रतिभा राणे, समाधान पाटील, छाया महाले, पूनम पाटील, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील उपस्थित होते. ग्रंथालय समृद्धी योजनाजि.प.च्या शाळांमध्ये ग्रंथांची संख्या वाढावी यासाठी प्रत्येक शिक्षकाने दर महिन्याला एक पुस्तक खरेदी करून ते वाचावे व नंतर आपल्या शाळेच्या ग्रंथालयास भेट द्यावे. ही योजना ऐच्छिक असेल. शिक्षकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. २३७ शाळा डिजीटलजिल्हाभरात २३७ शाळा डिजीटल झाल्या असून, ५३ शाळा आयएसओ झाल्या आहेत. आयएसओ शाळांची संख्या आणखी वाढेल, असे सांगण्यात आले. परीक्षेचेे वेळापत्रक नाही, नर्सरी प्रवेशाबाबत नोंदणी सुरूअद्याप जि.प.च्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा घेण्याबाबतचे परिपत्रक किंवा सूचना वरिष्ठांकडून आलेल्या नाहीत. १० दिवस आगोदर परीक्षा घेण्याचे नियोजन अजून नाही. पण ३ ते ६ एप्रिल दरम्यान चाचणी परीक्षा घेण्याचे आदेश आहेत. तसेच खाजगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणानुसार नर्सरी व पहिलीच्या वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. २१ ते ३१ मार्च दरम्यान शाळांमध्ये नोंदणी करायची आहे. या तारखेनंतर ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होईल. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींच्या पाल्यांना या योजनेतून प्रवेश मिळेल, असेही सांगण्यात आले. आरोग्य केंद्रांमध्ये दोन शवपेट्या मिळणार७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन शवपेट्या प्राप्त व्हाव्यात, असा प्रस्ताव शासनाला पाठविल्याची माहिती आरोग्य समितीच्या सभेत अधिकार्यांनी दिली. मंगळवारी दुपारी सभापती सुरेश धनके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सदस्य डॉ.प्रवीण पाटील, कोकीळा पाटील, सुशीला तावडे, वैशाली पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते. ३०३ आरोग्य उपकेंद्रांना कुंपण भींत व ५७ आरोग्य केंद्रांमध्ये पेव्हर, हायमास्ट आणि काँक्रीटीकरण करण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. तसेच जि.प.च्या शाळांसह ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४५० उपकेंद्रांना पुढील महिन्यापासून घरगुती दरानुसार वीज बिले येतील, असेही सभेत सांगण्यात आले.