समस्यांच्या विळख्यात सापडलेला बाराबलुतेदारांचा हा प्रभाग
By admin | Published: October 30, 2016 10:47 PM2016-10-30T22:47:13+5:302016-10-30T22:47:13+5:30
सटाणा:शहरातील प्रभाग क्र मांक सात हा जुन्या सटाण्याचा काही भाग समाविष्ट असलेला परिसर आहे.बाराबलुतेदारांचा रिहवास असलेला हा प्रभाग असून पाणी टंचाई ,गटारींच्या समस्या आणि याच परिसरात सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे पालिका प्रशासन मुलभूत सुविधा पुरविण्या ऐवजी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याची भावना रिहवाशांची आहे.या समस्यांच्या गर्तेतून आपल्याला बाहेर काढणारा कार्यक्षम प्रतिनिधी कसा मिळेल या शोधात येथील मतदार आहेत.
Next
स ाणा:शहरातील प्रभाग क्र मांक सात हा जुन्या सटाण्याचा काही भाग समाविष्ट असलेला परिसर आहे.बाराबलुतेदारांचा रिहवास असलेला हा प्रभाग असून पाणी टंचाई ,गटारींच्या समस्या आणि याच परिसरात सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे पालिका प्रशासन मुलभूत सुविधा पुरविण्या ऐवजी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याची भावना रिहवाशांची आहे.या समस्यांच्या गर्तेतून आपल्याला बाहेर काढणारा कार्यक्षम प्रतिनिधी कसा मिळेल या शोधात येथील मतदार आहेत.शहरातील सोनार गल्ली ,कॅप्टन अनिल पवार चौक ,कचेरी रोड ,नामपूरकर चाळ,शिंदे वाडा ,न्यू प्लॉट हा परिसर या प्रभागात समाविष्ट करण्यात आला .या प्रभागात मराठा ,माळी समाजाचे प्राबल्य असले तरी अल्पसंख्यांकांची सख्या त्या बरोबरीने आहे.या परिसरातील रस्ते दहा वर्षांपूर्वीच चकाचक झाले आहेत .मात्र पाणी टंचाई पासून कधीही हा परिसर मुक्त होऊ शकला नाही .उलट या भागात तुंबलेल्या गटारी व सांडपाणी याच भागात सोडून प्रशासन प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.विद्यमान नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांचा हक्काचा हा गड मात्र त्यांना देखील प्रभागात आपल्या कामाचा ठसा उमटवता आला नाही .उलट माजी नगरसेवक सुनील मोरे यांनी कुठलेही पद नसतांना त्यांनी मंत्रालयात हेलपाटे मारून जुनी कचेरी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी एक कोटी रु पयांचा निधी मिळवून आणत या प्रभागाच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम केले.मात्र अलीकडच्या काळातील प्रतिनिधींनी मुलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्षच केले असून समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या येथील नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर शहराचे स्वप्न प्रत्येक्षात उतरविणारा कार्यक्षम नगरसेवकाच्या प्रतीक्षेत मतदार दिसत आहे.अशी आहे प्रभाग रचना .....हा प्रभाग खुला प्रवर्ग व ओबीसी मिहलेसाठी राखीव आहे.एकूण३४२८ इतकी लोकसंख्या असलेल्या या प्रभागात २७१७ मतदार संख्येपैकी १३७३ पुरु ष व १३४४ स्री मतदार आहेत.नव्याने झालेल्या या प्रभाग रचनेत उत्तरेकडून औंदाणे शीव पासून ताहाराबाद ते सटाणा रस्त्याने स्व.पंडितराव धर्माजी पाटील चौक ते पूर्वेकडून ताहाराबाद ते सटाणा रस्त्याने प्रीतम ज्यूस सेंटर समोरील रामतुळस इमारतीसह पश्चिमेकडे वळून जिल्हा परिषद शाळेच्या उत्तर बाजूच्या कुंपणाने कचेरी रोडला येऊन दक्षिणेकडे महात्मा फुले रस्त्याच्या मराठे यांच्या इमारतीसह पश्चिमेकडे वळून कॅप्टन अनिल चौकातून दक्षिणेकडे वळून श्रीराम मंदिरासह चावडी चौकापर्यंत दक्षिणेकडे सोनार गल्लीने पश्चिमेकडे महादेव मंदिर ,विठ्ठल मंदिर ,मारु ती मंदिरासह पश्चिमेकडे श्री महालक्ष्मी मंदिरासह आरमनदी किनार्या पर्यंत पश्चिमेकडे आरमनदी किनार्याने पश्चिमेकडे औंदाणे शीवने ताहाराबाद ते सटाणा रस्त्यापर्यंत