रेल्वेच्या प्रलंबित मागण्यांवर बोर्डाकडे पाठपुरावा करु विभागीय व्यवस्थापक : उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी मागण्यांवर चर्चा
By admin | Published: August 14, 2015 12:33 AM2015-08-14T00:33:00+5:302015-08-14T00:33:00+5:30
सोलापूर : रेल्वेचे दुहेरीकरण आणि कुर्डूवाढी कारखान्यासाठी आर्थिक तरतूद या दोन बाबी वगळता इतर मागण्यांसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करू. उद्योजक, प्रवासी यांना सर्वप्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मध्य रेल्वेचे नवे विभागीय व्यवस्थापक ए़ के. दुबे यांनी दिले़
Next
स लापूर : रेल्वेचे दुहेरीकरण आणि कुर्डूवाढी कारखान्यासाठी आर्थिक तरतूद या दोन बाबी वगळता इतर मागण्यांसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करू. उद्योजक, प्रवासी यांना सर्वप्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मध्य रेल्वेचे नवे विभागीय व्यवस्थापक ए़ के. दुबे यांनी दिले़ विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर चंेबर ऑफ क ॉमर्सचे माजी सचिव केतन शहा आणि हुंडेकरी असोसिएशनचे अध्यक्ष बाबुराव घुगे यांच्या नेतृत्वाखाली उद्योजक आणि प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळाने नवे विभागीय व्यवस्थापक दुबे यांची भेट घेतली़ प्रारंभी उद्योजकांच्या वतीने फुलांचा बुके देऊन त्यांचे स्वागत केले़ त्यानंतर रेल्वे सेवेशी निगडीत विविध १८ प्रश्नांवर चर्चा केली़(प्रतिनिधी)काय आहेत मागण्या़़़* सोलापूर-हैदराबाद इंटरसिटी नवी गाडी सुरु करा़* हुबळी-सिकंदराबाद गाडी होटगीपर्यंत येते ती सोलापूरपर्यंत आणावी़* सोलापूर-नागपूर नवीन एक्स्प्रेस सुरु करा़* कोल्हापूर-नागपूर दोन गाड्या सुरु असून त्यापैकी एक सोलापूरहून सोडावी़* पंढरपूर-विजापूर लाईनचा सर्व्हे झाला असून पुढील कार्यवाही करावी़* गुलबर्गा विभागाला बोर्डाने परवानगी दिली नाही़ सोलापूर विभागाची विभागणी होऊ देऊ नये़* बाळे गुड्स शेड येथे पत्राशेड उभे करा़* सोलापूर-जळगाव नवीन रेल्वे मार्गाचा सर्व्हे २००७ साली झाला़ लाईनचे काम सुरु करावे़* सोलापूर स्थानकावर सरकते जिने बसवावेत़* पंढरपूर, कुर्डूवाडी, अक्कलकोट स्थानकांवर शौचालय, स्नानगृहाची सुविधा द्यावी़* मंुबई-सोलापूर, सोलापूर-यशवंतपूर गाड्यांचा रेक सोलापूर स्थानकावर थांबून असतो़ एक रेक पुण्याला पाठवून परत सोलापूरला आणावा़ दरम्यान, इंद्रायणीवरील ताण कमी होईल़* जुन्या गुड्स शेडवर तिकीट आरक्षित कार्यालय, वाहनतळ, स्नानगृहासाठी सात कोटींची मागणी केली असून ती बोर्डाकडे पुन्हा करावी़* सोलापूर-मुंबई गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याणहून पनवेलमार्गे वळवावी़ * दक्षिण भारतात नाशवंत पदार्थ घेऊन जाणारे डबे सोलापूर स्थानकावर उघडावेत किंवा सोलापूरसाठी नवे पार्सल डबे जोडावेत़* रामवाडी, लक्ष्मी विष्णू मिलच्या बाजूला पार्किंग व तिकीट खिडक्या खोलाव्यात़* प्लॅटफॉर्मवरील हमालांची संख्या वाढवावी़----------------------------------------------------फोटो - १३ एचआर ०२नवे विभागीय व्यवस्थापक ए़ के. दुबे यांचे उद्योजकांच्या वतीने स्वागत करताना केतन शहा, बाबुराव घुगे, जिल्हा प्रवासी संघाचे संजय पाटील आणि संजय चौगुले.