मुलगी झाल्याने मोबाइलवरुन तलाक, न्याय देण्याचं योगींचं आश्वासन

By admin | Published: April 4, 2017 10:31 AM2017-04-04T10:31:29+5:302017-04-04T11:59:52+5:30

मुलगी झाल्याने पतीने फोनवरुन तीन वेळा तलाक शब्द उच्चारत तलाक दिल्याची घटना समोर आली आहे

Divorce from mobile due to daughter, Yogi assurance for justice | मुलगी झाल्याने मोबाइलवरुन तलाक, न्याय देण्याचं योगींचं आश्वासन

मुलगी झाल्याने मोबाइलवरुन तलाक, न्याय देण्याचं योगींचं आश्वासन

Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 4 - मुलगी झाल्याने पतीने फोनवरुन तीन वेळा तलाक शब्द उच्चारत तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच या पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांना न्याय देण्याचं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे. ही पीडित तरुणी लखीमपूर खीरीची रहिवासी आहे. योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने जाहीरनाम्यात ट्रिपल तलाकचा मुद्दा समोर ठेवत निवडणूक लढवली होती. ट्रिपल तलाकवरुन सुरु झालेला वाद तसा नवा नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यावर वारंवार चर्चा केली जात आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला या मुद्द्यावर आपली बाजू मांडण्याचं आव्हान केलं होतं. 
 
मुलगी झाल्यानंतर वागणुकीत बदल - 
खीरीहून आलेली सबरीन आणि तिचे पिता छोटे मियाँ हे मेहवांगंजचे राहणारे आहेत. मेहवांगंज यांनी सांगितल्याप्रमाणे दोन वर्षापूर्वी मुलगी सबरीनचं लग्न सीतापूरच्या हाजी तुफैलसोबत केलं होतं. सुरुवातीला सर्व व्यवस्थित चालू होतं, पण जेव्हा मुलगी झाली तेव्हा त्यांच्या वागणुकीत बदल झाला. सासू, सास-यांसहित सगळ्यांनीच टोमणे मारण्यास सुरुवात केली. यानंतर सबरीनला माहेरी धाडण्यात आलं. सबरीनची मुलगी आता 11 महिन्यांची झाली आहे. गेल्याच आठवड्यात सबरीनच्या पतीने फोनवरुन तीन वेळा तलाक शब्द उच्चारत नातं संपवून टाकलं. पोस्टाने कागदपत्रही पाठण्यात आली आहेत. 
 
(ट्रिपल तलाक संपवा, गर्भवती महिलेचं मोदींना पत्र)
(ट्रिपल तलाक विरोधात 10 लाख मुस्लिम मैदानात)
 
निवडणुकीत भाजपाने दिलेल्या आश्वासनाच्या आधारे आम्ही योगी आदित्यनाथांकडे मदत मागण्यासाठी आलो असल्याचं छोटे  मियाँ बोलले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक पोलिसांना कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. मंगळवारी छोटे मिया एसपींची भेट घेऊन आपली तक्रार नोंदवणार आहेत. 
 
(ट्रिपल तलाकची सुनावणी घटनापीठासमोर होणार)
 
कुराणानुसार आधी तलाक दिल्यानंतर व्यक्तीला आपल्या या निर्णयावर विचार करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात येतो. यानंतरही जर तो आपल्या निर्णयावर कायम असेल तर अजून दोन वेळा तलाक बोलल्यास तलाक दिला असं मानलं जातं. अनेक इस्लामिक देशांमध्ये ही परंपरा बंद करण्यात आली आहे. मात्र भारतात अद्यापही या प्रथेचं पालन केलं जातं. मुस्लिम राष्ट्रीय मंचने या प्रथेविरोधात याचिका दाखल केली आहे. भाजपाने उत्तर प्रदेश निवडणुकीत मिळवलेल्या विजयनांतर या याचिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. भाजपाने ट्रिपल तलाकला केलेला विरोध पाहता अनेक मुस्लिम महिलांनी आम्हाला मत दिल्याचा दावा भाजपाने केला आहे.
 
 भाजपाने उत्तर प्रदेश निवडणुकीत इतिहास रचत दणदणीत विजय मिळवला आहे. 403 जागांच्या विधानसभेत भाजपाने 312 जागा जिंकल्या आहेत. 1980 नंतर उत्तरप्रदेशात इतका मोठा विजय मिळवणारा भाजपा पहिलाच पक्ष आबे. जनगणनेनुसार उत्तरप्रदेशातील 20 कोटींच्या लोकसंख्येतील 18 टक्के मुस्लिम आहेत. 
 
सामाजिक सुधारणांच्या नावाखाली वैयक्तिक कायद्यांचे पुनर्लेखन केले जाऊ शकत नाही. हा धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्दा असल्याने न्यायालय त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असे सांगून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तीन तलाक (या शब्दाचा तीनदा उच्चार करून घटस्फोट देणे) प्रथेचे सर्वोच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले होते. मुस्लिम महिलेने सर्वोच्च न्यायालयात या प्रथेला आव्हान दिले. ही प्रथा घटनाविरोधी असल्याचा तिचा दावा आहे.  
 
हत्या होण्यापेक्षा, तीन शब्द बरे...
‘वैयक्तिक कायदे हे घटनेचे उल्लंघन करणारे आहेत असे म्हणून त्यांना आव्हान देता येत नाही. जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे,’ असे या मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.

Web Title: Divorce from mobile due to daughter, Yogi assurance for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.