सुशिक्षित कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक : मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 11:16 AM2020-02-17T11:16:43+5:302020-02-17T11:16:50+5:30
अनेकदा आपल्या कुटुंबातील महिलांना अधिक त्रासदायक कामं करावी लागतात. तर हिंदू संघटीत व्हावा असेही ते यावेळी म्हणाले.
नवी दिल्ली : घटस्फोटाची प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली असून, सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचं, मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. रविवारी संघाच्या कार्यकर्त्यांना अहमदाबादमध्ये ते संबोधत होते.
भागवत यावेळी म्हणाले की, सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबात घटस्फोटाची अनेक प्रकरणे सद्या समोर येत आहेत. कारण कारण शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्यामुळे ही कुटंब छोट्या-छोट्या कारणांवरून वाद घालतात आणि पुढे जाऊन ते थेट घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहचत, असल्याचे ते म्हणाले.
संघातील उपक्रमांबाबत स्वयंसेवकांनी आपल्या कुटुंबीयांनाही सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे. कारण अनेकदा आपल्या कुटुंबातील महिलांना अधिक त्रासदायक कामं करावी लागतात. तर हिंदू संघटीत व्हावा असेही ते यावेळी म्हणाले.