Diwali 2021: भाजपाच्या इशाऱ्यावर लोकांनी दिवाळीला मुद्दाम फटाके फोडले, आपचे नेते गोपाल राय यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 04:49 PM2021-11-05T16:49:34+5:302021-11-05T16:51:06+5:30
Pollution In Delhi: दिल्लीचे पर्यावरणमंत्री Gopal Rai यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे BJPचा हात आहे.
नवी दिल्ली - देशभरात दिवाळीचा सण उत्साहात सुरू आहे. यादरम्यान, लोकांकडून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजीही केली जात आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. दरम्यान, दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे भाजपाचा हात आहे. तसेच दिल्लीच्या आजूबाजूला कडबा जाळण्यात आल्याच्या सुमारे साडेतीन हजार घटना घडल्या. त्याचाही परिणाम दिल्लीमध्ये दिसला आणि हवेची गुणवत्ता बिघडली.
त्याशिवाय गोपाल राय यांनी सांगितले की, भाजपाच्या नेत्यांनी, फटाके जाळल्यामुळे काही होत नाही. हा धर्म आणि सणांचा विषय आहे. आता सर्व शास्त्रज्ञ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे सांगत आहेत. फटाक्यांमुळे प्रदूषण होते. दोन दिवसांपूर्वी हवेची जी गुणवत्ता होती, ती आज नाही आहे.
दिवाळीमध्ये रात्री फटाके फोडण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दिल्लीमध्ये हवा प्रदूषण शिखरावर होते. तसेच शनिवारीही हवाप्रदूषण धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी पूसा, मंदिर मार्ग, मेजर ध्यानचंद स्टेडियम, श्नीनिवासपुरी, आनंद विवाह, कर्णी सिंह शूटिंग रेंज आणि ओखलासह सर्वच परिसरात एक्यूआय ९९९ नोंद झाली.
दरम्यान, दिवाळीपूर्वी एक दिवस आधी गोपाल राय यांनी विरोधी पक्षांना फटाके फोडणे हे धर्माशी जोडू नका, असे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले होते की, आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका. काही लोक आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप केला.