दिवाळीत घातपाताचा कट उधळला, बब्बर खालसा इंटरनॅशनलचे चार अतिरेकी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 09:36 AM2023-11-05T09:36:26+5:302023-11-05T09:37:17+5:30

एसएसपी मनजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकेबंदीमध्ये शरणजीत व विलियम याला आधी गजाआड करण्यात आले होते.

Diwali attack foiled, four of militants Babbar Khalsa International arrested by police | दिवाळीत घातपाताचा कट उधळला, बब्बर खालसा इंटरनॅशनलचे चार अतिरेकी जेरबंद

file photo

चंडीगड : बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या चार अतिरेक्यांना पंजाब पोलिसांनी फिरोजपूर सीमेवरून जेरबंद केले आहे. दिवाळीत पंजाबमध्ये घातपात करण्याचा या अतिरेक्यांचा कट होता. या प्रकरणातील सहा अतिरेक्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. 

एसएसपी मनजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकेबंदीमध्ये शरणजीत व विलियम याला आधी गजाआड करण्यात आले होते. या दोघांच्या चौकशीत सहज प्रीत सिंह व अमरजित सिंहबाबत माहिती मिळाली. त्यानंतर दोघांनाही जेरबंद केले. 

पाकमधून शस्त्रे व बनावट चलनाचा पुरवठा
पाकिस्तानमध्ये दडलेला अतिरेकी रिंदा हा आयएसआयच्या साथीने ड्रोनद्वारे शस्त्रे व बनावट चलनाचा पंजाबमध्ये पुरवठा करतो. अटकेतील अतिरेकी अमेरिकेत राहणारा अमृतसरचा हरप्रीत सिंह हॅपी व इंग्लंडमध्ये दडलेला गुरदासपूरचा निशान सिंह याच्यासाठी काम करतात, अशी माहिती पोलिसांनी चौकशीत मिळाली.

५ पिस्तुल, ९ मॅग्झिन, २३ काडतुसे केली जप्त 
अतिरेकी पाकिस्तानमध्ये दडलेल्या  रिंदासाठी काम करीत होते. रिंदा सीमेपलीकडून या अतिरेक्यांना शस्त्रे व बनावट चलन पाठवत होता. अटकेतील अतिरेक्यांकडून पाच पिस्तूल, नऊ मॅग्झिन, २३ काडतुसे जप्त करण्यात आली. 

साथीदारांचा शोध; पोलिसांची मोहीम
अतिरेकी दिवाळीत घातपात करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती सहज प्रीत सिंह याने पोलिसांना दिली. या प्रकरणात अतिरेक्यांचे साथीदार गुरप्रीत सिंह, दलेर सिंह, निशान सिंह व हरप्रीत सिंहचा शोध सुरू आहे.

Web Title: Diwali attack foiled, four of militants Babbar Khalsa International arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.