मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 78 दिवसांचा बोनस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 04:48 PM2022-10-12T16:48:35+5:302022-10-12T16:51:00+5:30

Modi Cabinet : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Diwali gift to railway employees from Modi government! 78 days bonus announced | मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 78 दिवसांचा बोनस जाहीर

मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 78 दिवसांचा बोनस जाहीर

googlenewsNext

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने आज रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, रेल्वेच्या 11.27 लाख कर्मचाऱ्यांना 1,832 कोटी रुपयांचा प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस दिला जाईल. त्याची कमाल मर्यादा 17,951 रुपये असणार आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

तेल वितरण कंपन्यांना एकरकमी अनुदान
यासोबतच मंत्रिमंडळाने तेल वितरण कंपन्यांना 22000 कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान दिले आहे. जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत वाढ होऊनही देशांतर्गत बाजारात एलपीजीच्या किमती त्याच प्रमाणात न वाढल्याने जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गुजरातमध्ये बांधले जाणार कंटेनर टर्मिनल 
याचबरोबर,पत्रकार परिषदेत कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, गुजरातमधील (Gujarat) कांडला येथे दीनदयाल बंदर प्राधिकरणाअंतर्गत कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय कार्गो बर्थ ( Multi Purpose Cargo Berth) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

मंत्रिमंडळातील इतरही निर्णय...
पूर्वोत्तर राज्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी PM-devine योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना चार वर्षांसाठी (2025-26 पर्यंत) असणार आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाने बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2022 मंजूर केले आहे, जे बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002 मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये 97 व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदींचा समावेश असणार आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. 


रेल्वेवर 1832.09 कोटी इतका बोजा
रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यासाठी रेल्वेवर 1832.09 कोटी इतका बोजा पडणार आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी पेमेंट म्हणून दरमहा 7000 रुपये दिले जातात. 78 दिवसांनुसार कर्मचार्‍यांना बोनस म्हणून 17,951 रुपये दिले जातील. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात रेल्वेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कोरोना महामारीच्या काळातही रेल्वेने अनेक आर्थिक लक्ष्य गाठले आहे. 2021 मध्ये माल वाहतुकीत 184 मिलियन टनापर्यंत वाढ झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस प्रोत्साहन कामासाठी दिले जाते. 

Web Title: Diwali gift to railway employees from Modi government! 78 days bonus announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.