पंतप्रधानांची जवानांसोबत दिवाळी

By admin | Published: October 30, 2016 03:31 PM2016-10-30T15:31:34+5:302016-10-30T15:31:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस, लष्कर आणि डोग्रा स्काऊटच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

Diwali with the Prime Minister's Youth | पंतप्रधानांची जवानांसोबत दिवाळी

पंतप्रधानांची जवानांसोबत दिवाळी

Next
ऑनलाइन लोकमत
किन्नौर (हिमाचल प्रदेश),  दि. 30 - " दिवाळी आपल्या लोकांसोबत साजरी करावी असे वाटते, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो आहे," असे उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस, लष्कर आणि डोग्रा स्काऊटच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.  यावेळी पंतप्रधान आणि जवानांनी एकमेकांना मिठाई भरवली. तसेच तासाभराच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्याचे कौतुक केले.  
पंतप्रधान  मोदींच्या प्रत्येक वर्षीच्या दिवाळी कार्यक्रमाप्रमाणेच यावर्षीही दिवाळीच्या कार्यक्रमाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. दरम्यान, आज हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील सुमडो येथे पंतप्रधान जवानांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी आले. येथे येण्यापूर्वी, मोदींनी वाटेतील स्थानिकांचीही भेट घेतली.  पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे जवानांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
(यंदाची दिवाळी वीर जवानांना समर्पित - पंतप्रधान)
यावेळी मोदी म्हणाले, " दिवाळी आपल्या लोकांसोबत साजरी करावी असे वाटते, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो आहे. सुरक्षा दलांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा देशवासीयांचा उर अभिमानाने भरून येईल अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली."  या भेटीदरम्यान, जवानांकडून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणाही दिल्या. 
 

Web Title: Diwali with the Prime Minister's Youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.