दिवाळीची उलाढाल ६० हजार कोटींची; आठ महिन्यांच्या खंडानंतर संचारला उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 01:31 AM2020-11-14T01:31:31+5:302020-11-14T06:57:43+5:30

व्यापाऱ्यांना अपेक्षा

Diwali turnover of Rs 60,000 crore | दिवाळीची उलाढाल ६० हजार कोटींची; आठ महिन्यांच्या खंडानंतर संचारला उत्साह

दिवाळीची उलाढाल ६० हजार कोटींची; आठ महिन्यांच्या खंडानंतर संचारला उत्साह

Next

नवी दिल्ली : फटाके, मिठाई, नवीन कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टीव्ही, वॉशिंग मशीन अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या असून, खरेदीसाठी ग्राहकांचीही झुंबड उडाली आहे. तब्बल आठ महिन्यांच्या खंडानंतर बाजारात उत्साह
निर्माण झाला असून, दिवाळीत तब्बल ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

कोरोना कहरामुळे ब्रेक लागलेली अर्थव्यवस्था ऑक्टोबरपासून पुन्हा सावरू लागली असून, हळूहळू बाजारात उत्साह संचारू लागला आहे. दिवाळीत उत्साहाने टोक गाठले असून, ग्राहकही मोठ्या संख्येने बाजाराकडे वळू लागले आहेत. दुकाने वस्तूंनी ओसंडून वाहत आहेत आणि ग्राहकही खरेदीचा उत्साह दाखवत आहेत.

गेल्या आठ महिन्यांत झालेला व्यापारातील तोटा भरून निघेल, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केली आहे. निदान ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल दिवाळीच्या काळात  होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  फटाक्यांपासून घरगुती वस्तूंपर्यंत सर्वच मालाला उठाव असल्याचे दिसून येत आहे.  चिनी वस्तूंची खरेदी करणे मात्र कटाक्षाने टाळले जात आहे. 

दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंची रेलचेलही बाजारात आहे. सुकामेवा, मिठाई, उंची चीजवस्तू, घड्याळे, दागिने इत्यादींच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे निरीक्षण एका व्यापाराने नोंदवले. पंतप्रधानांनी स्वदेशी वस्तूंची  खरेदी करा, असे आवाहन  केल्याने अनेकजण स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देत असल्याचे आढळून येत आहे. 

Web Title: Diwali turnover of Rs 60,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी