५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 06:30 AM2019-10-10T06:30:58+5:302019-10-10T06:35:02+5:30
सातव्या वेतन आयोगाने ठरवून दिलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार ही वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : केंद्र सरकारचेकर्मचारी व निवृत्तीवेतनधारक (पेन्शनर) यांना मूळ वेतनाच्या पाच टक्के एवढा वाढीव महागाई भत्ता (डीए) देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या सेवेतील तब्बल ४९.९३ लाख कर्मचारी व ६५.२६ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
सातव्या वेतन आयोगाने ठरवून दिलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार ही वाढ करण्यात आली आहे. सध्या कर्मचारी आणि पेन्शनरना मूळ वेतनाच्या १२ टक्के एवढा महागाई भत्ता मिळतो. तो आता पाच टक्क्यांनी वाढला असून, १७ टक्के झाला आहे. वाढत्या महागाईमुळे वेतन व पेन्शनचा होणारा मूल्यºहास विचारात घेऊन महागाई निर्देशांकाच्या प्रमाणात दरवर्षी १ जानेवारी व १ जुलैपासून महागाई भत्त्यामध्ये सुधारणा केली जाते.
महागाई भत्त्यामध्ये करण्यात आलेल्या वाढीमुळे केंद्र सरकारवर दरवर्षी एकूण १५,९०९ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. यापैकी ८,५९० कोटी रुपये सध्या सेवेत असणाºया कर्मचाºयांना आणि ७,३१९ कोटी रुपये निवृत्त कर्मचाºयांना दरवर्षी वाढीव महागाई भत्त्यापोटी मिळतील.
जुलै, २०१९ ते फेब्रुवारी, २०२० या चालू वित्त वर्षातील आठ महिन्यांत सरकारला कर्मचाºयांच्या वाढीव महागाई भत्त्यावर ५,७२६ कोटी रुपये व निवृत्त कर्मचाºयांच्या वाढीव याच भत्त्यापोटी ४,८७० कोटी रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत.