केंद्रीय कर्मचा-यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

By admin | Published: October 27, 2016 02:30 PM2016-10-27T14:30:02+5:302016-10-27T14:39:45+5:30

दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Diwali visits to central employees, 2 percent increase in dearness allowance | केंद्रीय कर्मचा-यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

केंद्रीय कर्मचा-यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  आज केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्याची घोषणा केली.  1 जुलै 2016 पासून नवा महागाई भत्ता लागू होणार आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर 2015 मध्ये महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर  मार्च 2016 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 6 टक्क्यांनी वाढून125 टक्के करण्याची घोषणा केली. सध्या सुमारे 1 कोटी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना 119 टक्के महागाई भत्ता दिला जातो. फेब्रुवारी महिन्यातच सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची योजना केली होती.

महागाई भत्त्यातील वाढीचा 48 लाख कर्मचारी व 55 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. गेल्या वर्षभरातील महागाई दराच्या आकडेवारीचा अभ्यास करुन सरकारतर्फे वर्षात दोनवेळा महागाई भत्त्यात बदल केला जातो. यापुर्वी मार्च २०१६ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ करण्यात आली होती.

Web Title: Diwali visits to central employees, 2 percent increase in dearness allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.