डीएमके प्रमुख करुणानिधींना मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 11:24 AM2017-08-16T11:24:18+5:302017-08-16T11:35:42+5:30
डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांना बुधवारी (16 ऑगस्ट) सकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नवी दिल्ली, दि. 16 - डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांना बुधवारी (16 ऑगस्ट) सकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोग्य तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. सकाळी 10.15 च्या सुमारास करुणानिधींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यामध्ये लावण्यात आलेली ‘फीडिंग ट्यूब’ बदलण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करुणानिधी यांची प्रकृती स्थिर असून संध्याकाळपर्यंत त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक एस. एस. अरविंदन यांनी दिली होती. मात्र काही वेळातच त्यांनी घरी सोडण्यात आले.
डिसेंबर 2016 मध्येही करुणानिधी होते हॉस्पिटलमध्ये
डिसेंबर महिन्यामध्ये करुणानिधी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यावेळी 7 दिवस त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात आले होते.
DMK President M.Karunanidhi admitted to Kauvery Hospital in Chennai for an endoscopic procedure, (File Pic) pic.twitter.com/kElSmolbGk
— ANI (@ANI) August 16, 2017