...तर पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक - लष्करप्रमुख

By admin | Published: January 13, 2017 04:18 PM2017-01-13T16:18:23+5:302017-01-13T16:27:21+5:30

सीमारेषेवरील परिस्थिती कायम राहिली नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे

... to do it again Surgical Strike - Army Chief | ...तर पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक - लष्करप्रमुख

...तर पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक - लष्करप्रमुख

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधी उल्लंघन थांबलं आहे. पण जर परिस्थिती कायम राहिली नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. लष्करप्रमुख पदाचा पदभार स्विकारल्यानंतर बिपीन रावत यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले जवानांचे व्हिडीओ, पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधी उल्लंघन सोबत अनेक मुख्य मुद्यांवर भाष्य केलं. 
 
 
'असंतृष्ट जवानांना आपल्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात येईल', असं बिपीन रावत बोलले आहेत. 
 
'जवानांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून तक्रारी न करता तक्रारपेटीचा वापर करावा', असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 'लष्करी मुख्यालयासह अन्य केंद्रांवर लष्कराकडून सल्ला आणि तक्रारपेटीची सेवा सुरु करण्यात येत असल्याचे', त्यांनी सांगितले.  'ज्यांना कुणाला तक्रारी असतील त्यांनी तक्रारपेटीचा आधार घ्यावा. आम्ही जवानांच्या म्हणण्याची दखल घेऊ', असे त्यांनी सांगितले. 'ज्यांच्या तक्रारी सुटल्या नाहीत, त्यांनी थेट माझ्याकडे यावे', असे रावत यांनी सांगितले. तक्रारी, समस्या मांडणा-या जवानांची ओळख गुप्त ठेवण्याचे आश्वासन रावत यांनी दिले. 
 
चंदू चव्हाणांच्या सुटकेवर बोलताना 'जवानाला परत आणण्यासाठी एक प्रक्रिया असते, तिचं पालन केलं जाईल', असं बिपीन रावत यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सुरु केलेल्या छुप्या युद्धावर बिपीन रावत यांनी चिंता व्यक्त केली.
 

Web Title: ... to do it again Surgical Strike - Army Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.