मुलींना परक्याचे धन मानू नये : मुख्यमंत्री फोटो आहे

By admin | Published: February 29, 2016 10:01 PM2016-02-29T22:01:37+5:302016-02-29T22:01:37+5:30

पणजी:

Do not accept girls as foreign money: Chief Minister photo | मुलींना परक्याचे धन मानू नये : मुख्यमंत्री फोटो आहे

मुलींना परक्याचे धन मानू नये : मुख्यमंत्री फोटो आहे

Next
बत फोटो-
जळगाव : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याची गुंतवणुकीवर अबकारी कर लावल्यामुळे सोने व चांदीचे दागिने महाग होणार आहे. दोन लाखांपेक्षा जास्त सोन्याच्या खरेदीसाठी पॅनकार्ड सक्तीचे केल्याने सोने खरेदीसाठी वापरण्यात येणार्‍या काळ्या पैशांना चाप बसणार आहे. तसेच दाळ उद्योग व ठिबक व पाईप उद्योगासाठी मोठी तरतूद केल्याने जळगाव शहरासाठी लाभदायक ठरणार असल्याचा सूर रोटरीतर्फे आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोमवारी दुपारी साडे चार वाजता चर्चासत्र झाले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल, माजी अध्यक्ष गनी मेमन, रमन जाजू, संगीता पाटील, किरण कक्कड, कुमार वाणी, नीलेश संघवी, संतोष बंब उपस्थित होते.
सीए जयेश दोशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने व चांदीवरील गुंतवणूक कमी करण्यासाठी पावले उचलली आहे. त्यात सोन्यावर एक टक्क अबकारी कर आकारणी केल्याने दागिने महाग होणार आहे. तसेच दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी करायचे असल्यास पॅनकार्ड सक्तीचे केल्यामुळे काळ्या पैशांच्या गंुतवणुकीला चाप बसणार आहे.

सीईओ अनिल पाटकर : अर्थसंकल्पात सुक्ष्मसिंचनासाठी मोठी तरतूद केल्यामुळे जळगावातील पाईप उद्योगाला निश्चित लाभ होणार आहे. देशात रस्ते व रेल्वेच्या मार्गासाठी दोन लाख १८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जलमार्गावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकर्‍यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांची योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेती व पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. बुडीत बँकांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या ऐवजी कर्जवसुली तसेच कामकाजात सुधारणेला प्राधान्य गरजेचे होते.

सीए एच.एन.जैन : अर्थसंकल्प हा चांगला आहे. शेती, ग्रामीण भागातील नागरिक तसेच पायाभूत सुविधांवर भर देण्यासाठी मोठी तरतूद केली आहे. कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोग देण्यासाठी एक लाख १० हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणातील निधी शासन कसा उभा करणार आहे, त्याबाबत मात्र स्पष्ट केले नाही.

Web Title: Do not accept girls as foreign money: Chief Minister photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.