फेसबूकवर "या" प्रश्नांची उत्तरं देऊ नका, अकाऊंट हॅक होण्याची शक्यता
By admin | Published: May 2, 2017 05:09 PM2017-05-02T17:09:43+5:302017-05-02T17:09:43+5:30
जर का तुम्ही अगोदरच अशा लिंकवर क्लिक केलेलं असेल तर तात्काळ त्यासंबंधी सर्व डाटा डिलीट करुन टाका
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - फेसबूकवर सध्या एक सेक्यूरिटी रिस्क चर्चेत आहे. फेसबूकवर प्रश्न विचारुन लोकांची माहिती चोरली जात आहे. हे एका गेमप्रमाणे असून यामध्ये तुम्हाला अशा 10 कॉन्सर्टची नाव फेसबूकवर टाकायची आहेत, ज्यांना तुम्ही उपस्थिती लावली होती. तुम्ही दिलेल्या उत्तरांपैकी एक उत्तर चुकीचं किंवा खोटं असेल. तुमच्या मित्रांना तुम्ही दिलेल्या उत्तरांपैकी कोणतं उत्तर चुकीचं आहे म्हणजेच कोणत्या कॉन्सर्टला हजेरी लावली नव्हती याचा अंदाज लावायचा आहे.
खेळताना मजा येत असली तरी यामध्ये सुरक्षेची मोठी जोखीम आहे. कारण पहिला कॉन्सर्ट कोणता होता ज्याला तुम्ही उपस्थित होता ? हा प्रश्न सुरक्षा भेदणारा आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी क्लिक केल्यास त्या क्षणाला तुमचं अकाऊंट हॅक होईल. त्यामुळे जर का असे प्रश्न विचारण्यात आले तर त्याकडे दुर्लक्ष करत उत्तर देणं टाळा.
तज्ञांनी अशा पोस्टपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच जर का कोणी अगोदरच अशा लिंकवर क्लिक केलेलं असेल तर तात्काळ त्यासंबंधी सर्व डाटा डिलीट करुन टाका. तसंच या पोस्ट प्रायव्हेट करा जेणेकरुन इतरांना दिसणार नाही. एकदा का तुम्ही या लिंकवर क्लिक केलंत तर तुमचा आयडी हॅक होऊन त्याचा गैरवापर होऊ शकतो.