केवळ प्रजनन यंत्र बनू नका

By admin | Published: September 28, 2014 02:59 AM2014-09-28T02:59:01+5:302014-09-28T02:59:01+5:30

नारी ही विश्वाची जननी आहे, याबद्दल तिने अभिमान बाळगायला हवा़; पण म्हणून केवळ प्रजननाचे यंत्र बनून राहू नका, असे आवाहन माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी केल़े

Do not become a breeding machine only | केवळ प्रजनन यंत्र बनू नका

केवळ प्रजनन यंत्र बनू नका

Next
>जयपूर : नारी ही विश्वाची जननी आहे, याबद्दल तिने अभिमान बाळगायला हवा़; पण म्हणून केवळ प्रजननाचे यंत्र बनून राहू नका, असे आवाहन माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी केल़े
‘वूमेन-एजंट ऑफ चेंज’ या विषयावरील महिला उद्योजिकांच्या परिषदेला संबोधित करताना आज शनिवारी त्या बोलत होत्या़ आजर्पयत पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणा:या अनेक क्षेत्रतही महिलांनी बाजी मारली आह़े महिलांसाठी कुठलेच क्षेत्र मागे उरलेले नाही़ निर्धार केला तर महिला सर्व काही करू शकतात़ हाच आत्मविश्वास बाळगून प्रत्येक महिलेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी़ तेव्हाच ख:या अर्थाने महिला सशक्तीकरण घडू शकेल, असे त्या म्हणाल्या़ अनेक घरात मुलाला मुलीपेक्षा श्रेष्ठत्वाची वागणूक दिली जात़े; पण माङया पालकांनी मला कधीही मुलापेक्षा कमी लेखले नाही, असा एक स्वानुभवही त्यांनी यावेळी कथन केला़ (वृत्तसंस्था)

Web Title: Do not become a breeding machine only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.