"आत्महत्या करु नका", सुषमा स्वराजांची नैराश्यग्रस्त महिलेला मदत
By admin | Published: March 31, 2017 10:14 AM2017-03-31T10:14:15+5:302017-03-31T10:33:37+5:30
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी एका नैराश्यात गेलेल्या महिलेला मदत करत आत्महत्या करण्यापासून रोखले
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा आपल्या संयमी स्वभावामुळे लोकांची मनं जिंकली आहेत. ट्विटरवर मदत मागितल्यानंतर तात्काळ उत्तर देत मदतीला धावणा-या सुषमा स्वराज यांचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून आता प्रत्येकजण त्यांच्याकडे मदत मागत आहे. त्यांच्या या मदतीच्या स्वभावामुळे लोकांनी तर त्यांना रेफ्रिजेटर खराब झाल्याचंही सांगायचं सोडलं नाही. पण त्यांनाही सुषमा स्वराजांनी शांतपणे उत्तर दिलं. मात्र गुरुवारी सुषमा स्वराज यांनी एका नैराश्यात गेलेल्या महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले.
एका महिलेने गुरुवारी सुषमा स्वराज यांना ट्विट करत आपल्याला व्हिसा मिळत नसल्याचं सांगितलं. "कृपया माझा व्हिसा मिळवून देण्यासाठी मला मदत करा. माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मला आत्महत्या करावी लागेल का ?" असं ट्विट ज्योती पांडे नावाच्या या महिलेने केलं होतं. सुषमा स्वराज यांनी नेहमीप्रमाणे तातडीने या ट्विटची दखल घेऊन उत्तर देत "तुम्ही हार मानू नका, तुमची समस्या सांगा", अशी विनंती केली. यावेळी सुषमा स्वराज यांनी त्या महिलेला "तुम्ही आत्महत्या करु नका, तुमचं म्हणणं सांगा", असंही सांगितलं.
@SushmaSwaraj
— Jyoti S Pande (@jyotiranapande) March 30, 2017
Please help me for my visa
Mere ko suicide krna parega kya.apni baat aap taak paguchane ko
यानंतर सुषमा स्वराज यांनी ज्योती पांडे यांच्यामध्ये खूप वेळ चर्चा सुरु होती. "मला न्यूझीलंडचा व्हिसा हवा आहे. माझे पती न्यूझीलंडचे रहिवासी असून मी एका समस्येत अडकले आहे. आतापर्यंत तीन वेळा मला व्हिसा नाकारण्यात आला आहे", अशी माहिती त्या महिलेने दिली. यावर सुषमा स्वराज यांनी आपला ईमेल आयडी देत व्हिसाची प्रत पाठवण्यास सांगितलं.
Aap suicide mat kijiye. Apni baat batayiye. https://t.co/Co81DSMRJU
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 30, 2017
Please help me for tourist visa....I want to visit New Zealand for meet my hubby and IN laws....mere father in law ki death ho gyi h.
— Jyoti S Pande (@jyotiranapande) February 23, 2017
केंद्रीय मंत्री असूनही सुषमा स्वराज यांनी आपली समस्या ऐकण्यासाठी इतका वेळ दिला याबद्दल त्या महिलेने आभार मानले. "देव तुम्हाला सर्व सुख देवो. माझं म्हणणं ऐकून घेतलंत आणि उत्तरही दिलंत", असं म्हणत तिने आभारप्रदर्शन केलं.
ट्विटरवर नेहमी सक्रीय असणा-या सुषमा स्वराज यांनी संयमी आणि शांतपणे या महिलेशी चर्चा केलेली पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. इतका वेळ चर्चा होत असताना एकदाही सुषमा स्वराज यांनी चर्चेतून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही, आणि संतापल्याही नाहीत.