बैल कापू नका, विजेसाठी वापरा!
By admin | Published: May 16, 2017 06:33 AM2017-05-16T06:33:12+5:302017-05-16T06:33:12+5:30
स्वदेशी’चा मूलमंत्र घेत, औषधे आणि सौदर्य प्रसाधनांपासून ते पौष्टिक खाद्यपदार्थांपर्यंत अनेक वस्तूंच्या उत्पादनाचा १० हजार कोटी रुपयांचा उद्योग उभारत
सुरेश भटेवरा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘स्वदेशी’चा मूलमंत्र घेत, औषधे आणि सौदर्य प्रसाधनांपासून ते पौष्टिक खाद्यपदार्थांपर्यंत अनेक वस्तूंच्या उत्पादनाचा १० हजार कोटी रुपयांचा उद्योग उभारत, बहुराष्ट्रीय कंपन्यांना धडकी भरविणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आता गोवंश रक्षणाचाही वसा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून बैलांची कत्तल करण्याऐवजी त्यांच्या शक्तीचा वापर करून वीजनिर्मिती करण्याच्या एका अभिनव प्रयोगावर कंपनीने संशोधन सुरू केले आहे.
बैलांचा वापर करून वीजनिर्मिती हा प्रथमदर्शनी कोणालाही विनोद वाटेल, पण हरिद्वार येथे पतंजलीच्या बैल कापू नका, विजेसाठी वापरा!मुख्यालयात बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या कल्पक पुढाकारातून हे वास्तव साकार होत आहे. भारतातल्या वाहन निर्मिती क्षेत्रातील एक बहुराष्ट्रीय कंपनी तसेच तुर्कस्तानची एक कंपनीही या अभिनव प्रयोगात सहभागी आहे.
या प्रकल्पाबाबत एका जाणकाराकडून मिळालेल्या माहितीनुसार,एका टर्बाईनव्दारे वीजनिर्मिती करण्याच्या या प्रयोगाला सुरूवातीलाच काही प्रमाणात यश प्राप्त झाले असून साधारणत: २.५ किलोवॅट पर्यंत वीज बैलांच्या शक्तिवर चालवलेल्या टर्बाईनवर तयार करता येते या निष्कर्षाप्रत हे संशोधन पोहोचले आहे. बैलांच्या शक्तिचा वापर करून अधिकाधिक वीजनिर्मिती कशी करता येईल, याचा प्रयत्न पतंजलीने सध्या चालवला आहे.
दिवसा नांगरणी, रात्री वीज
गोवंशातील जनावरांची विशेषत: बैलांची देशात मोठ्या प्रमाणावर कत्तल होते. पतंजली फूड प्रॉडक्टस कंपनीने या अभिनव प्रयोगाच्या प्राथमिक यशानंतर असा दावा केला आहे की, बैल हा उपयुक्त व शक्तिमान पशू असून, पूर्वीच्या काळी शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीसाठी त्यांचा वापर होत असे. कत्तलखान्यात त्याची रवानगी न करता, सकाळी शेतात
आणि सायंकाळी वीजनिर्मितीसाठी त्यांचा
वापर केल्यास ग्रामीण व दुर्गम भागात जिथे वीज पोहोचली नाही अथवा त्याची टंचाई आहे, तेथील ग्रामीण जनतेला विशेषत: शेतकऱ्यांना या प्रयोगाचा लाभ मिळू शकेल.