काश्मीरवर नको, दहशतवादावर चर्चा करा - भारत

By admin | Published: August 17, 2016 05:18 PM2016-08-17T17:18:32+5:302016-08-17T17:20:58+5:30

काश्मीर मुद्यावर परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेचा पाकिस्तानने दिलेला प्रस्ताव बुधवारी भारताने फेटाळून लावला.

Do not discuss Kashmir, talk about terrorism - India | काश्मीरवर नको, दहशतवादावर चर्चा करा - भारत

काश्मीरवर नको, दहशतवादावर चर्चा करा - भारत

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ -  काश्मीर मुद्यावर परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेचा पाकिस्तानने दिलेला प्रस्ताव बुधवारी भारताने फेटाळून लावला. काश्मीरवर नाही पण सीमेपलीकडून होणा-या दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा करा ही काश्मीरमधली सद्यस्थितीमधील मुख्य समस्या आहे असे भारताने स्पष्ट केले. 
 
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझीझ अहमद चौधरी यांच्या निमंत्रणावर भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी इस्लामाबादला जाण्याची इच्छा व्यक्त केली. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बामबावले यांनी भारताचे उत्तर पाकिस्तानला कळवले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पाकिस्तानने लगेच भारताला काश्मीर मुद्यावर चर्चेचे निमंत्रण दिले होते. काश्मीर मुद्यावर तोडगा काढणे दोन्ही देशांचे कर्तव्य आहे असे पाकिस्तानने निमंत्रण देताना म्हटले होते. 
 

Web Title: Do not discuss Kashmir, talk about terrorism - India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.