'भारत माता की जय'साठी कोणावर जबरदस्ती नको - मोहन भागवत
By admin | Published: March 28, 2016 04:17 PM2016-03-28T16:17:15+5:302016-03-28T16:17:15+5:30
'भारत माता की जय' ही घोषणा देण्याची कोणावर सक्ती करु नका, त्यापासून दूर रहा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवकांना केले.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २८ - 'भारत माता की जय' ही घोषणा देण्याची कोणावर सक्ती करु नका, त्यापासून दूर रहा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवकांना केले. आपले आचरण असे असले पाहिजे की, लोकांनी स्वत:हून 'भारत माता की जय' ही घोषणा दिली पाहिजे.
त्यांच्या आतून ही घोषणा ओठांवर आली पाहिजे असे भागवत यांनी सांगितले. सोमवारी लखनऊमधील ऐतिहासिक 'स्मृती भवन' लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. सर्व समाज या विषयावर ते बोलत होते. राष्ट्रवादाच्या घोषणा स्वेच्छेने दिल्या पाहिजेत. त्या बंधकारक नाहीत. प्रत्येकजण आपला आहे. आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे असे भागवत यांनी सांगितले.
रविवारी कोलकात्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी संपूर्ण जगाने भारत माता की जय बोलावे अशी आमची इच्छा असल्याचे म्हटले होते. एमआयएमचे अध्यक्ष असदउद्दीन ओवेसीही आज लखनऊमध्ये आहेत.