हिंदूनी आपली बलस्थाने विसरू नयेत , सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:48 PM2018-02-25T23:48:45+5:302018-02-25T23:48:45+5:30

हिंदूनी आपली बलस्थाने विसरता कामा नये. तुम्ही जेव्हा सबळ असता तेव्हाच तुमच्यातल्या सद्गुणांची लोकांना जाणीव होते. देवही दुर्बलाचा सन्मान राखत नाही.

 Do not forget about your strengths in Hindus, Sarasanghachalak Mohan Bhagwat's rendition | हिंदूनी आपली बलस्थाने विसरू नयेत , सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

हिंदूनी आपली बलस्थाने विसरू नयेत , सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

Next

मीरत : हिंदूनी आपली बलस्थाने विसरता कामा नये. तुम्ही जेव्हा सबळ असता तेव्हाच तुमच्यातल्या सद्गुणांची लोकांना जाणीव होते. देवही दुर्बलाचा सन्मान राखत नाही. स्वत:चे सामर्थ्य ओळखणारे कधीही प्रगती करु शकत नाहीत असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज म्हटले आहे.
भागवत पुढे म्हणाले की, विविधेत एकता हे सूत्र सर्वांनाच माहित आहे. पण विविधतेतही एकता असते. आपल्यातील ऐक्यामध्ये विविधतेला मोठा वाव आहे. या विविधतेचा आपण आदर केला पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू है हे आपण आवर्जून म्हटले पाहिजे. आपण एक आहोत कारण आपण हिंदू आहोत. भारत असा एकमेव देश आहे की जेथे अशी विविधता आढळते. सर्व हिंदूंनी एक झाले पाहिजे. हिंदूंवर या देशाचे उत्तरदायित्व आहे.

Web Title:  Do not forget about your strengths in Hindus, Sarasanghachalak Mohan Bhagwat's rendition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.