संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे देऊ नका
By Admin | Published: September 14, 2015 01:18 AM2015-09-14T01:18:40+5:302015-09-14T01:18:40+5:30
‘फेसबुक’ आणि ‘व्हॉटस् अॅप’ यासारख्या सोशल मीडियावरून संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे शेअर करू नका, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव दले
नवी दिल्ली : ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉटस् अॅप’ यासारख्या सोशल मीडियावरून संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे शेअर करू नका, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव दले आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिला आहे.
छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त प्रदेशातील आपल्या छावण्यातून सक्रिय मानवरहित विमानांची (यूएव्ही) छायाचित्रे निमलष्करी दलाच्या काही जवानांनी व्हॉटस् अॅप आणि फेसबुकद्वारे परस्परांना पाठविल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर गृहमंत्रालयाचा हा आदेश आला आहे. सीआयएसएफ, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्स यासारख्या सर्वच केंद्रीय सुरक्षा दलांना याबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशाची एक प्रत वृत्तसंस्थेला मिळाली आहे. त्यात म्हटले आहे की, प्रमुख संस्था आणि संवेदनशील स्थळे यांच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षादलांनी संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे देणे ही एक चिंताजनक बाब आहे.