दलिताच्या घरी जाऊन मागविले हॉटेलचे जेवण , उत्तर प्रदेशात भाजपा मंत्र्याचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:55 AM2018-05-03T04:55:49+5:302018-05-03T07:33:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाचे खासदार, आमदार व मंत्र्यांना दलित वस्त्यांमध्ये जाऊन राहण्याच्या, त्यांच्या घरी रात्री राहून जेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाचे खासदार, आमदार व मंत्र्यांना दलित वस्त्यांमध्ये जाऊन राहण्याच्या, त्यांच्या घरी रात्री राहून जेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपाचे मंत्री सुरेश राणा यांनी त्याचे पालन केलेत्र, पण हॉटेलातून जेवण मागवून ते दलिताच्या घरी जेवले. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
मंत्री जेवायला येणार, हे अलिगड जिल्ह्यातील लोहगडमधील एका दलित कुटुंबातील कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्याचा प्रश्नच नव्हता. केवळ मला घरी थांबा, असा निरोप मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला होता, असे कुटुंबप्रमुखाने सांगितले.
पण राणा यांच्या कार्यकर्त्यांनीच सारा कार्यक्रम तयार केला होता. त्याप्रमाणे राणा व कार्यकर्ते रात्री ११ वाजता त्या घरी पोहाचेले. तिथे कार्यकर्त्यांनी राणा यांच्यासाठी हॉटेलातून तंदूर रोटी, दाल माखनी, मटार पनीर, गुलाब जामून असे खाद्यपदार्थ मागवले. मिनरल पाण्याच्या बाटल्याही आणल्या. मंत्रीमहोदय व त्यांच्यासह आलेल्यांनी त्या जेवणाचा आस्वाद घेतला.
मात्र राणा यांनी स्वत:वरील आरोप अमान्य केला. १00 जण तिथे गेले होते. एवढ्या सर्वांसाठी तिथे जेवण असणे शक्यच नव्हते. त्यामुळे बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्यात आले.
उलट ते आपल्याकडे जेवतील, तेव्हा आपण पवित्र होऊ , असेही त्या म्हणाल्या. दलितांच्या घरी जाणे, त्यांच्यासह जेवणे हे प्रकार आता
जुने झाले आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, दलितांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे हे अधिक महत्त्वाचे आहेत.दुसरीकडे भाजपाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आपण कधीच दलितांच्या घरी जेवायला जात नाही. त्यांनाच जेवायला बोलावते. त्यांच्याकडे जेवायला मी काही श्रीराम नाही, असे विधान केले आहे. मी त्यांच्या घरी जेवल्यामुळे त्यांचे घर पवित्र होणार नाही.