राजकीय विरोधकांचा द्वेष करू नये

By admin | Published: November 15, 2014 01:59 AM2014-11-15T01:59:26+5:302014-11-15T01:59:26+5:30

कोणत्याही नेत्याने आपल्या राजकीय प्रतिस्पध्र्याविषयी द्वेषभावना वा शत्रुत्व ठेवू नये, तसेच पक्षातील कार्यकत्र्याच्या मनात भयही उत्पन्न करू नये,

Do not hate political opponents | राजकीय विरोधकांचा द्वेष करू नये

राजकीय विरोधकांचा द्वेष करू नये

Next
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानपिचक्या : पं. नेहरू जयंती, नेहरू-गांधी कुटुंबाची अनुपस्थिती
नवी दिल्ली : कोणत्याही नेत्याने आपल्या राजकीय प्रतिस्पध्र्याविषयी द्वेषभावना वा शत्रुत्व ठेवू नये, तसेच पक्षातील कार्यकत्र्याच्या मनात भयही उत्पन्न करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी येथे केले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष शरसंधान साधले.
 पं. जवाहरलाल नेहरू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नेहरू स्मृती संग्रहालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या या कार्यक्रमाला नेहरू-गांधी कुटुंबातील मात्र कोणीही उपस्थित नव्हते. लोकसभेचे पक्षनेते मल्लिकाजरुन खरगे हे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून हजर   होते.  
कार्यक्रमानंतर पत्रकारांनी याबाबतीत प्रश्न विचारले असता त्यांनी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा नामोल्लेख न करता त्यांचा समाचार घेतला. राहुल गांधी यांनी, क्रोधी लोक देश चालवीत आहेत, असे म्हणून पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाबाबत, केवळ फोटो छापून आणण्यासाठी केले जात असल्याचे वक्तव्य केले होते. 
त्याचबरोबर रस्त्यांची स्वच्छता होते आहे, तर दुसरीकडे समाजात वैरभाव पेरला जातो आहे, समाजाच्या पायालाच कमकुवत केले जात आहे, अशी टीकाही केली होती. यावर सिंग यांनी, भारतावर संकुचित मनोवृत्तीने राज्य केले जाऊ शकत नाही ही बाब नेहरूंनी जाणली होती, त्यामुळे त्यांच्या मनात विरोधी पक्षाविषयी कटुभाव कधी नव्हता, असा टोला लगावला. 
राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मोहंमद हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शांतिवनात जाऊन नेहरूंना श्रद्धांजली वाहिली.
 जेव्हा देश स्वच्छ होईल तेव्हा त्यांची मनेही स्वच्छ होतील. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा हा एक भाग आहे. जर राहुल गांधींना हे समजत नसेल तर त्याला कोणीच काही करू शकत  नाही, अशा शब्दांत केंद्रीयमंत्री    प्रकाश जावडेकरांनी राहुलवर टीकास्त्र सोडले.
 
असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करू नये
च्देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी आपल्या राजकीय विरोधकांविषयी कधीही वैरभाव बाळगला नाही, असे प्रतिपादन करून सिंह यांनी 1963 सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात त्यांनी रा. स्व. संघाला आमंत्रित केले होते या घटनेची आठवण सांगितली. 
 
च्आपल्या राजकीय विरोधकांप्रती द्वेषभाव नसावा, नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जाऊ नये व अनावश्यक वक्तव्ये करून देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जाऊ नये, असे ते म्हणाले.
 
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पं. जवाहरलाल नेहरूंना आपली श्रद्धांजली अर्पण केली. ऑस्ट्रेलियाच्या दौ:यावर असलेल्या मोदींनी सोशल नेटवर्किग साईट टि¦टरवर, आपण नेहरूंना श्रद्धांजली वाहत असल्याचे नोंदविले आहे. 
 
मोदींची टि¦टरवर श्रद्धांजली
च्स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या योगदानाला व त्यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला देश नेहमीच स्मरणात ठेवील, असे पुढे म्हटले आहे. 
 

 

Web Title: Do not hate political opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.