फाईव्ह स्टार हॉटेलचा नाही, सरकारी सोयींचाच वापर करा - मोदींची मंत्र्यांना ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 01:54 PM2017-08-20T13:54:28+5:302017-08-20T13:57:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा पक्षाच्या नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबतच प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत असणाऱ्यांची झाडाझडती घ्यायलादेखील पंतप्रधान मोदी मागेपुढे पाहात नाहीत.

Do not have a fixture star hotel, use government facilities - Modi's ministers warn | फाईव्ह स्टार हॉटेलचा नाही, सरकारी सोयींचाच वापर करा - मोदींची मंत्र्यांना ताकीद

फाईव्ह स्टार हॉटेलचा नाही, सरकारी सोयींचाच वापर करा - मोदींची मंत्र्यांना ताकीद

Next

नवी दिल्ली, दि. 20 - पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा पक्षाच्या नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबतच प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत असणाऱ्यांची झाडाझडती घ्यायलादेखील पंतप्रधान मोदी मागेपुढे पाहात नाहीत. पंतप्रधान मोदींकडून मंत्री आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सूचनांचीही अनेकदा चर्चा होते. पंतप्रधान मोदी सरकारच्या कारभाराविषयी अतिशय सजग असल्याचे चित्र आतापर्यंत वारंवार पाहायला मिळाले आहे. याचाच प्रत्येय आणखी एकदा आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी दौऱ्यादरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलचा वापर करणाऱ्या मंत्र्यांना ताकीद दिली आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना काही सुचना केल्या होत्या. यामध्ये मंत्र्यांनी फाईव्ह स्टार हॉटेलचा वापर टाळावा असेही सांगितले. ज्यावेळी सरकारी दौऱ्यावर जात असता त्यावेळी हॉटेलचा वापर न करता सरकारी सोयींचाच वापर करा अशी ताकीद दिली आहे.
मंत्री सरकारी दौऱ्यादरम्यान सार्वजनिक क्षेत्राच्या सोयीसुविधांचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाल्या होत्या. यामुळे नाराज झालेल्या मोदींनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांची झाडाझडती घेतली. सरकारी दौऱ्यादरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य करण्याच्या सवयींपासून दूर राहा, असे मोदींनी यावेळी मंत्र्यांना सांगितले. तसेच काही मंत्री निमशासकीय गाड्यांचा वापर खासगी कामांसाठी करत असल्याची तक्रार आपल्याकडे आल्याचे यावेळी त्यांनी मंत्र्यांना सांगितले. ही थेरं यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत, असा सज्जड दमच मोदींनी यावेळी उपस्थित मंत्र्यांना दिला.
भ्रष्टाचारविरोधात झिरो टॉलरन्स धोरणाबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी मंत्र्यांना बजावून सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकींना अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. यादरम्यान पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल, अशी कुठलीही घटना घडता कामा नये असे मोदींना वाटते. यामुळेच मंत्र्याना ते वारंवार सावध राहण्याच्या सूचना देत आहेत.
यापूर्वीही सदेच्या अधिवेशनादरम्यान अनुपस्थित राहणाऱ्या भाजपच्या खासदारांना मोदींनी फैलावर घेतले आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान अनुपस्थितीत राहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदी यांनी संसदीय दलाच्या बैठकीत सुनावले होते. पंतप्रधानांनी भाजपच्या खासदारांना संसदेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. संसदीय कामकाजादरम्यान सतर्क आणि सजग राहण्याचा सल्लादेखील मोदींनी खासदारांना दिला.

Web Title: Do not have a fixture star hotel, use government facilities - Modi's ministers warn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.