वारंवार व्हिलन ठरवू नका, मला जगू द्या - अमर सिंग
By admin | Published: January 1, 2017 10:41 AM2017-01-01T10:41:34+5:302017-01-01T10:47:30+5:30
सपात झालेल्या वादासाठी मला वारंवार व्हिलन बनवू नका, मला जगू द्या, अशी विनंती अमर सिंग यांनी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 1 - उत्तर प्रदेशमधील शक्तिशाली राजकीय घराणे असलेल्या यादव परिवारात समाजवादी पक्षातील वर्चस्वाच्या लढाईतून माजलेल्या यादवीसाठी अमर सिंग यांना जबाबदार धरण्यात येत आहे. त्यामुळे निराश झालेल्या अमर सिंग यांनी मला वारंवार व्हिलन बनवू नका, मला जगू द्या, अशी विनंती केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव यांच्यातील वाद तात्पुरता संपुष्टात आला असला तरी अमरसिंग यांनाच दोष दिला जात आहे. याबाबत अमर सिंग म्हणाले. "सपमध्ये होणाऱ्या वादांसाठी मला गुन्हेगार ठरवणे योग्य नाही. मला जगू द्या, जर या वादासाठी मी जबाबदार असेन तर मुलायम सिंग यांनी माझी पक्षातून हकालपट्टी करावी, जर पक्षातील परिपक्व नेत्यांना मी भडकावले असेल तर त्यांनी लपवू नये, ती बाब आपल्या कुटुंबीयांच्या कानावर घालावी. जर तसे नसेल तर स्पष्टीकरण द्यावे,"
#WATCH London: Amar Singh reacts on allegations that he is behind feud in the Samajwadi Party pic.twitter.com/gy6g3cKiKT
— ANI UP (@ANINewsUP) 1 January 2017