भारताचा धर्मांध पाकिस्तान होऊ देऊ नका - पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाझ
By Admin | Published: October 10, 2015 01:20 PM2015-10-10T13:20:36+5:302015-10-10T13:21:08+5:30
पाकिस्तानी कार्यकर्ती आणि कवयित्री फहमिदा रियाझ यांनी भारत आधी होता तसा होऊ दे, त्याचा पाकिस्तान होऊ देऊ नका अशी साद घातली आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - मुझफ्फरनगर आणि दादरीमधल्या मुस्लीमांविरोधातील घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कार्यकर्ती आणि कवयित्री फहमिदा रियाझ यांनी भारत आधी होता तसा होऊ दे, त्याचा पाकिस्तान होऊ देऊ नका अशी साद घातली आहे. १९९६मध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टी प्रथम सत्तेत आली त्यावेळी त्यांनी तुम बिलकूल हम जैसे निकले ही कविता लिहिली होती, आणि भारत हा पाकिस्तानप्रमाणे कसा कट्टर धार्मिक बनत आहे याची व्यथा मांडली होती. इंडियन एक्स्प्रेसने टेलीफोनच्या माध्यमातून रियाझ यांच्याशी संपर्क साधला असता, आत्ताएवढी १९९६ साली वाईट स्थिती नव्हती असे उद्गार त्यांनी काढले आहेत. भारतात जन्माला आलेल्या उदारमतवादी रियाझ यांचे धार्मिकदृष्ट्या कट्टर बनलेल्या पाकिस्तानात हाल झाले. झिया उल हक यांच्या काळात तर त्यांना मार्च १९८१ ते डिसेंबर १९८७ या कालावधीत भारताचा आसरा घ्यावा लागला. त्यावेळच्या म्हणजे १९९६ सालच्या भारताला संबोधणारी ही कविता असली तरी ती मूळात पाकिस्तानमधला धार्मिक कट्टरतावाद अधोरेखीत करते. धर्माशी नाळ जोडून पाकिस्तानने प्रचंड मोठी चूक केल्याचे रियाझ म्हणतात. जवळपास अर्धा शतक पाकिस्तान धार्मिक जोखडाखाली असून भारतही जवळपास तिथंच पोचत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
धार्मिक उन्मादाला आवर घाला, भारताचा पाकिस्तान होऊ देऊ नका अशी विनंती रियाझ यांनी केली आहे. धर्मद्वेषाचे जहर पसरवणा-यांना माझी कविता काही चांगली बुद्धी देईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. रियाझ यांनी याआधी मार्च २०१४मध्ये हम गुनहगार औरते या परिषदेमध्ये ही कविता भारतीय रसिकांना ऐकवली होती.
फहमिदा रियाझ यांची मूळ कविता:
तुम बिल्कुल हम जैसे निकले
तुम बिल्कुल हम जैसे निकले
अब तक कहाँ छिपे थे भाई
वो मूरखता, वो घामड़पन
जिसमें हमने सदी गंवाई
आखिर पहुँची द्वार तुम्हारे
अरे बधाई, बहुत बधाई।
प्रेत धर्म का नाच रहा है
कायम हिंदू राज करोगे ?
सारे उल्टे काज करोगे !
अपना चमन ताराज़ करोगे !
तुम भी बैठे करोगे सोचा
पूरी है वैसी तैयारी
कौन है हिंदू, कौन नहीं है
तुम भी करोगे फ़तवे जारी
होगा कठिन वहाँ भी जीना
दाँतों आ जाएगा पसीना
जैसी तैसी कटा करेगी
वहाँ भी सब की साँस घुटेगी
माथे पर सिंदूर की रेखा
कुछ भी नहीं पड़ोस से सीखा!
क्या हमने दुर्दशा बनाई
कुछ भी तुमको नजर न आयी?
कल दुख से सोचा करती थी
सोच के बहुत हँसी आज आयी
तुम बिल्कुल हम जैसे निकले
हम दो कौम नहीं थे भाई।
मश्क करो तुम, आ जाएगा
उल्टे पाँव चलते जाना
ध्यान न मन में दूजा आए
बस पीछे ही नजर जमाना
भाड़ में जाए शिक्षा-विक्षा
अब जाहिलपन के गुन गाना।
आगे गड्ढा है यह मत देखो
लाओ वापस, गया ज़माना
एक जाप सा करते जाओ
बारम्बार यही दोहराओ
कैसा वीर महान था भारत
कैसा आलीशान था-भारत
फिर तुम लोग पहुँच जाओगे
बस परलोक पहुँच जाओगे
हम तो हैं पहले से वहाँ पर
तुम भी समय निकालते रहना
अब जिस नरक में जाओ वहाँ से
चिट्ठी-विठ्ठी डालते रहना।