आम्हाला नडू नका, भारताला नाही झेपणार - चीन
By admin | Published: June 28, 2017 02:53 PM2017-06-28T14:53:46+5:302017-06-28T19:42:27+5:30
भारतीय हद्दीत घुसखोरी करणा-या चीनने उलट भारतावरच नियम मोडल्याचा आरोप केला आहे. सिक्कीमच्या डोकाला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरी करुन...
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - भारतीय हद्दीत घुसखोरी करणा-या चीनने उलट भारतावरच नियम मोडल्याचा आरोप केला आहे. सिक्कीमच्या डोकाला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरी करुन भारतीय जवानांना धक्काबुक्की केल्याने दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. भारत नियमबाहय कामे करत असून त्यांना नियम शिकवण्याची गरज असल्याचे ग्लोबल टाइम्स या चीन सरकारच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.
भारताला अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देश पाठिंबा देत असल्याने आपण सैनिकी दृष्टया वरचढ असल्याची भारताची भावना असून त्यामुळे भारत उद्दामपणा करतोय असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. भारताचा जीडीपी जगात पाचव्या क्रमांकावर असल्याने देश म्हणून भारताचा आत्मविश्वास सध्या भलताच उंचावला आहे. पण भारत अजून चीनपेक्षा भरपूर मागे आहे हे भारताने लक्षात घ्यावे असे ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा
सीमा मुद्यावर आमच्यासोबत शक्तिपरीक्षा भारताला परवडणारी नाही असे म्हटले आहे. सीमावादाला भारताकडून चिथावणी मिळते तरीही, चीन शांतता आणि संयम राखून असल्याचे लेखात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारत आणि अमेरिकेच्या वाढलेली जवळीकही चीनला खटकली असून, चीनचा तिळपापड झाला आहे.
भारतीय लष्करानं भारत आणि चीनच्या सीमाभागावर सिक्कीमजवळ चीनला रस्ता बनवण्यास रोखलं होतं. सिक्कीममधला डोका ला हा भाग चीन स्वतःचा असल्याचा दावा करतो. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी सिक्कीममध्ये घुसखोरी करून भारतात प्रवेश केला होता. सीमेचे संरक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांशी त्यांची धक्काबुक्कीही झाली होती. चिनी
सैनिकांनी भारतीय जवानांचे दोन बंकरही नष्ट केले होते.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भारतीय लष्करानं मानवी साखळी तयार करून चिनी घुसखोरांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला होता. ह्यपीएलएह्णच्या काही सैनिकांनी या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते आणि काही छायाचित्रेही काढली होती. याच घटनेत डोका ला भागातील लालटेन येथील दोन बंकर उद्ध्वस्त केले गेले. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची 20 जून रोजी ध्वजबैठकही झाली. तरीही तणाव निवळलेला नाही.