शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नका

By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:58+5:302015-08-20T22:09:58+5:30

भारत भालके : मंगळवेढय़ात दुष्काळावर उपाययोजनेसाठी जनावरांचा मोर्चा

Do not look at the end of peasants' patience | शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नका

शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नका

Next
रत भालके : मंगळवेढय़ात दुष्काळावर उपाययोजनेसाठी जनावरांचा मोर्चा
फोटो क्रमांक : 20पंड 5 व 6
फोटो ओळी - मंगळवेढा तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात सहभागी झालेले शेतकरी. त्यांच्या विराट जनसमुदायासमोर बोलताना आ. भारत भालके
---
मंगळवेढा : गेल्या तीन महिन्यांपासून चारा व पाण्याअभावी जनावरांबरोबर माणसांची तडफड होत असताना झोपेत असलेले जिल्हाधिकारी दुष्काळाबाबत कोणतीही उपाययोजना करायला तयार नाहीत. माणसांच्या कैफियतची जाण नसलेल्या जिल्हाधिकार्‍यांना जागे करण्यासाठी जनावरांचा मोर्चा काढावा लागला आहे. शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत न पाहता चारा व पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करुन दुष्काळ जाहीर करावा अन्यथा जिल्?ातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालू असा इशारा आमदार भारत भालके यांनी दिला.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयावर जनावरे, मेंढरांसह शेतकर्‍यांचा अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला. मोर्चास दामाजी पुतळ्यापासून सुरुवात झाली. या मोर्चात 400 बैलगाड्यांसह सुमारे दहा हजार शेतकरी उपस्थित होते. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी भालके बोलत होते.
आ.भालके म्हणाले, अच्छे दिन आणू म्हणणार्‍या भाजपने जनतेला फसविले आहे. निवडणुकीत रामराज्याची भाषा करणार्‍यांनी सध्या रावणाचे राज्य आणले आहे. सध्याचे फडणवीस सरकार व पालकमंत्री नेभळट असून जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांच्या शब्दाला शासन दरबारी कवडीची किंमत नाही. उजनीतील पाणी न सोडल्याने शेतकर्‍यांचे पंधरा हजार कोटींचे नुकसान होत आहे.
जनावरांना चारा व पाणी उपलब्ध नसताना जिल्हाधिकारी मात्र हायड्रोफोनिक्स मक्याचा ट्रे घेऊन प्रात्यक्षिक दाखवून दुष्काळग्रस्तांच्या जळत्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. उजनीतून पाणी न सोडल्याने ऊस पिकांसह फळपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. एकरी पन्नास हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी. समान पाणी वाटपाचा कायदा असताना उजनीच्या वरील चौदा धरणे कशी काय भरून घेतली याबाबत प्रशासन मूग गिळून का गप्प बसले आहे. शिवाय उजनीतील पाणी सोडण्यास खुद्द जलसंपदा मंत्री व पालकमंत्री अनुकूल असताना अधिकार्‍यांचा विरोध केल्यामुळे यावरुन अधिकार्‍यांची मग्रुरी जिल्?ातील जनतेसमोर आली आहे.
यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार र्शीकांत पाटील यांना देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कारंडे, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी चोख पोलीस बंदोबस्त केला.
यावेळी शशिकांत बुगडे, निर्मला काकडे, अरुणा दत्तू, सुरेश कोळेकर, पी.बी.पाटील, तानाजी खरात, रामेश्वर मासाळ, अर्जुन पाटील, फिरोज मुलाणी, भुजंगराव पाटील, भारत पाटील, पोपट पडवळे, दत्ता पडवळे, शिवानंद पाटील, जयंत साळे, संगीता क?े, मुझफ्फर काझी, विलास डोके, दीपक कलुबर्मे, विजय खवतोडे, सुहास पवार, अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, रावसाहेब फटे, मारुती वाकडे, दत्ता गणपाटील, रामभाऊ वाकडे, दत्ता भोसले, दयानंद सोनगे, दिलीप जाधव, रणजित पाटील, काका डोंगरे, पांडुरंग भाकरे आदी उपस्थित होते.
---------------------------------
चौकट -
मोर्चातील जनावरांनी वेधले लक्ष

आज झालेल्या मोर्चामध्ये तब्बल चारशे बैलगाड्यांसह शेकडो शेळ्या, मेंढय़ांचा सहभाग होता. त्यामुळे ही जनावरेच सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होती.
-----------पूर्ण-------------

Web Title: Do not look at the end of peasants' patience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.