जवानांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, मेहबूबा मुफ्तींची चेतावणी
By admin | Published: June 23, 2017 03:57 PM2017-06-23T15:57:51+5:302017-06-23T15:59:36+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीबाहेर तैनात असलेल्या डीएसपी मोहम्मद अयुब पंडित यांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 23 - जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीबाहेर तैनात असलेल्या डीएसपी मोहम्मद अयुब पंडित यांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना अत्यंत लाजिरवाणी असल्याचं मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरमधील लोकांना चेतावणीदेखील दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना त्यांनी सांगितलं की, "जर पोलिसांच्या संयमाचा हा परिणाम असेल तर येणा-या दिवसांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे असं किती दिवस चालणार आहे ? जर असंच चालू राहिलं तर जसं आधी पोलिसांची जीप पाहताच लोक पळ काढायचे तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते", असं मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत.
मेहबूबा मुफ्ती डीएसपी पंडित यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, "यापेक्षा लाजिरवाणं काय असू शकतं ? डीएसपी पंडित तिथे लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. पोलीस येथील लोकांसोबत जास्तीत जास्त संयमाने वागत आहे. लोकांना हे समजलं पाहिजे. आपल्या वागण्यात बदल करण्यासाठी अजूनही लोकांकडे वेळ आहे".
#WATCH: J&K CM Mehbooba Mufti speaks on death of Deputy SP Mohammed Ayub Pandith, says "police exercising max restraint,ppl must understand" pic.twitter.com/M9uOvkaLH5
— ANI (@ANI_news) June 23, 2017
जम्मू-काश्मीरमध्ये जमावानं मशिदीबाहेर मोहम्मद आयुब पंडित यांची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करून या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर सुरक्षा व्यवस्थेसाठी ते तैनात होते.
Logon ko samajhna chahiye achha kya hai bura kya hai, jo unki hifazat ke liye wahan duty kar raha tha use hi lynch kr diya: J&K DGP SP Vaid pic.twitter.com/rzT8EbFAQ1
— ANI (@ANI_news) June 23, 2017
रमजानच्या महिन्यातील शेवटचा शुक्रवार लक्षात घेता मशिदीबाहेरच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडायला नको यासाठी पोलिसही गस्त घालत होते. यावेळी जामिया मशिदमध्ये "शब-ए-कद्र"ची प्रार्थना सुरू होती. रमजानमधील नमाज पठण असल्यानं खबरदारी म्हणून मशिदींबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. . तिथे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडितही तैनात होते. ते मशिदीचा फोटो काढत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला. काही वेळ गोंधळ उडाला. पोलीस अधिकाऱ्यानं हवेत गोळीबार केला. त्यात ३ लोक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. हत्या करण्याआधी त्यांना निर्वस्त्र करण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.