वादग्रस्त वक्तव्ये करू नका, नरेंद्र मोदींच्या भाजपा नेत्यांना कानपिचक्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 09:24 PM2018-04-22T21:24:54+5:302018-04-22T21:37:06+5:30

मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वारंवार अडचणीत सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या लहान मोठ्या नेत्यांची हजेरी घेतली

Do not make controversial statements - Narendra Modi | वादग्रस्त वक्तव्ये करू नका, नरेंद्र मोदींच्या भाजपा नेत्यांना कानपिचक्या 

वादग्रस्त वक्तव्ये करू नका, नरेंद्र मोदींच्या भाजपा नेत्यांना कानपिचक्या 

Next

नवी दिल्ली - मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वारंवार अडचणीत सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या लहान मोठ्या नेत्यांची हजेरी घेतली असून, वादग्रस्त वक्तव्ये करू नका, प्रसारमाध्यमांशी बोलताना संयम बाळगा, अशी सूचना त्यांनी केली आहे. 




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून भाजपा खासदार आणि आमदारांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी पक्षाच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. मोदी म्हणाले, " आम्ही चुका करतो आणि प्रसारमाध्यमांच्या हाती आयते कोलीत देतो. जेव्हा कॅमेरा पाहतो तेव्हा आम्ही प्रत्येक विषयातील तज्ज्ञ असल्याच्या थाटात वक्तव्य करण्यासाठी उतावीळ होतो. मग प्रसारमाध्यमे अशा वक्तव्यांचा वापर करून घेतात. ही प्रसारमाध्यमांची चूक म्हणता येणार नाही. 



 

यावेळी मोदींनी सोशल मीडियावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला  नेत्यांना दिला.  तसेच खासदारांचे त्यांच्या चांगल्या कामासाठी कौतुक केले. तसेच जनधन योजना, कौशल विकास योजना, मुद्रा योजना यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. पंतप्रधानांनी खासदार आणि आमदारांसोबत ग्रामविकास आणि शेतकऱ्यांच्या हितांसदर्भात चर्चा केली. तसेच पंचायत स्तरावर विकासकार्यांसंदर्भात चर्चा केली.  

Web Title: Do not make controversial statements - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.