अपंगत्व आल्यास सेवेतून काढू नका
By admin | Published: October 13, 2016 05:10 AM2016-10-13T05:10:06+5:302016-10-13T05:10:06+5:30
सरकारी सेवेत असताना अपंगत्व आल्यास कर्मचाऱ्यास नोकरीवरून काढू नका, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व शासकीय विभागांना दिल्या
नवी दिल्ली : सरकारी सेवेत असताना अपंगत्व आल्यास कर्मचाऱ्यास नोकरीवरून काढू नका, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व शासकीय विभागांना दिल्या आहेत.केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम-१९७२ मध्ये योग्य त्या सुधारणा केल्या. यामुळे अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यास शासकीय सेवेत राहाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याला इन्व्हॅलिड पेन्शनही मिळू शकते. कायम अपंगत्वामुळे सेवा करण्यास अक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांना असे निवृत्ती वेतन दिले जाते. अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना अपंग व्यक्ती (समान संधी, हक्क संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) कायदा-१९९५ च्या कलम ४७ लागू करण्यात यावे. कलम ४७ मध्ये अपंगत्व आलेल्या कोणाही कर्मचाऱ्यास सेवेतून काढू नये, अथवा पदावरून काढू नये, असेही कलमात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)