डोन्ट रन अवे, डोन्ट एस्केप; नेटिझन्सची आमिरवर टीका

By Admin | Published: November 25, 2015 12:20 AM2015-11-25T00:20:46+5:302015-11-25T00:20:46+5:30

राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलताना ‘माझ्या पत्नीला मुलांची काळजी वाटते, तिला देश सोडावासा वाटतो

Do not Run Away, Do not Escape; Natijans' Aamirwa criticism | डोन्ट रन अवे, डोन्ट एस्केप; नेटिझन्सची आमिरवर टीका

डोन्ट रन अवे, डोन्ट एस्केप; नेटिझन्सची आमिरवर टीका

googlenewsNext

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलताना ‘माझ्या पत्नीला मुलांची काळजी वाटते, तिला देश सोडावासा वाटतो,’ असे विधान करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर टिष्ट्वटर आणि फेसबुकवर नेटिझन्सनी मंगळवारी प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली. दिवसभरात एक लाखाहून अधिक टिष्ट्वटस् आणि रिटिष्ट्वटस्मधून आमिरवर टीका करण्यात आली. भारतात जर असहिष्णू वातावरण वाटत असेल तर पळून जाऊ नको. लोकांना जगण्यास आशा वाटेल असे काहीतरी कर, अशा शब्दांत लोकांनी आमिर खानला सल्लेही दिले.
आमिर खानच्या वक्तव्याविरोधात अभिनेते अनुपम खेर यांनी पहिली आघाडी उघडून ‘इन्क्रेडिबल इंडिया’साठी काम करणाऱ्या तुला गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये अचानक ‘इंटॉलरंट इंडिया’ कसा काय वाटू लागला असे विचारले. आजवर याहून कठीण काळाचा सामना तू केलास आणि तेव्हा कधीही हा देश सोडावासा वाटला नाही, हे तू तुझी पत्नी किरणला सांगितलेस का? किरणचा कोणत्या देशात निघून जाण्याचा विचार आहे आणि याच देशाने आमिर खानला घडविले आहे हे तू तिला सांगितलेस का, असा प्रश्नही खेर यांनी त्याला टिष्ट्वटरवरून विचारला.
खेर यांच्यापाठोपाठ अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनीही खरा देशभक्त संकटकाळातही मातृभूमीला सोडून जात नाही, ‘डोंट एस्केप, बिल्ड इट’ अशा शब्दांमध्ये आमिरला सल्ला दिला.
‘ज्या वेळेस व्यवस्था योग्यरीत्या काम करत नाही तेव्हा त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. त्यापासून पळून जाऊ नका आणि असे करणाराच नायक असतो’, अशा शब्दांमध्ये अभिनेते ऋषी कपूर यांनी आमिरच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
फेसबुक आणि टिष्ट्वटरवरही आमिरच्या या वक्तव्यावर विविध मते दिवसभर उमटत राहिली. आमिरचा नवा सिनेमा लवकरच येत असल्यामुळे त्याने हा वाद ओढवून घेतला असाही सूर काही ठिकाणी लावण्यात आला, तर ‘आमिर आॅन इनटॉलरन्स’ या हॅशटॅगवर सतत टिष्ट्वटस् होत राहिले.
(प्रतिनिधी)
- सातारा जिल्ह्यातील कर्नल संतोष महाडिक यांचे नुकतेच दहशतवाद्यांशी लढताना निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या पत्नीने मी माझी दोन्ही मुले देशासाठी लष्करातच पाठवेन, असे जाहीर केले. एक वीरपत्नी सौभाग्य गेले तरी आपल्या मुलांना देशसेवेसाठी देईन म्हणते आणि आमिरची पत्नी मात्र मुलांसाठी देश सोडण्याचा विचार करते, अशी तुलना करणारे संदेश दिवसभर टिष्ट्वटर, फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपवर फिरत राहिले.

Web Title: Do not Run Away, Do not Escape; Natijans' Aamirwa criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.