दिल्लीत दररोज धावणार नाहीत १० लाख कार

By admin | Published: December 13, 2015 10:28 PM2015-12-13T22:28:49+5:302015-12-13T22:28:49+5:30

सम-विषम क्रमांकाचा फॉर्म्युला नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून लागू होताच दिल्लीत सुमारे १० लाख कार दररोज रस्त्यावर उतरणार नाहीत.

Do not run daily in Delhi, 10 lakh cars | दिल्लीत दररोज धावणार नाहीत १० लाख कार

दिल्लीत दररोज धावणार नाहीत १० लाख कार

Next

नवी दिल्ली : सम-विषम क्रमांकाचा फॉर्म्युला नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून लागू होताच दिल्लीत सुमारे १० लाख कार दररोज रस्त्यावर उतरणार नाहीत. प्रदूषणाच्या वाढत्या स्तराला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण जवळजवळ निम्म्याने कमी होणार आहे.
दिल्लीत नोंदणीकृत सुमारे १९ लाख चारचाकी खासगी वाहने आहेत. केजरीवाल सरकारने अवलंबलेल्या धोरणानुसार सम- विषम क्रमांकाच्या वाहनांना आलटून- पालटून धावण्याला परवानगी दिली जाणार असल्याने दररोज निम्मी वाहनेच रस्त्यांवर उतरतील. दिल्लीत नोंदणी झालेल्या चारचाकी वाहनांमध्ये कार, जीप, व्हॅनचा समावेश आहे. प्रारंभी १५ दिवस प्रायोगिक स्तरावर हा आदेश राबविला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. हिवाळ्यात राजधानीतील प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष आयआयटी- कानपूरने अभ्यासातून काढला आहे.
दिल्लीलगतच्या नोएडा, गुडगाव, गाझियाबाद, फरिदाबाद आणि सोनिपत भागात प्रवेश करणारी चारचाकी वाहने तसेच ५७ लाख बाईक आणि स्कूटरच्या संख्येवर नियंत्रण आणण्याबाबतही केजरीवाल सरकारला निर्णय घ्यावा लागेल.
> वाहन उत्पादक कंपन्यांना मोठ्या नुकसानीची धास्ती
1 राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) राजधानीत नव्या डिझेल वाहनांच्या नोंदणीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाहननिर्मात्या कंपन्यांनी मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. या आदेशामुळे आधीपासून नोंदणी झालेल्या वाहनांच्या पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
2 ज्या ग्राहकांनी डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची खरेदी करताना आधीच पूर्ण किंवा आंशिक रक्कम चुकती केली आहे. त्यांची नोंदणी आणि पुरवठ्याचे काय करायचे याबाबत सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या कंपन्यांनी केली आहे.
वर्षाच्या अखेरीस राजधानीतील शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वाहनांना मोठी नुकसानभरपाई सोसावी लागेल
सर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहनांवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर करतात.

Web Title: Do not run daily in Delhi, 10 lakh cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.