पैसे काढून घरात साठवू नका - RBI
By admin | Published: November 13, 2016 02:55 PM2016-11-13T14:55:59+5:302016-11-13T14:55:59+5:30
बँकेतून वारंवार पैसे काढून ते घरात घरात साठवू नका असे आवाहन रिझर्व्ह बँकेतर्फे करण्यात आले आहे. पाचशे आणि हजार रूपयांची नोटबंदी झाल्याने नोटा बदली करण्यासाठी बँका आणि एटीएमबाहेर सर्वसामान्य
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - बँकेतून वारंवार पैसे काढून ते घरात घरात साठवू नका असे आवाहन रिझर्व्ह बँकेतर्फे करण्यात आले आहे. पाचशे आणि हजार रूपयांची नोटबंदी झाल्याने नोटा बदली करण्यासाठी बँका आणि एटीएमबाहेर सर्वसामान्य नागरिकांनी केलेली गर्दी पाहता आरबीआयतर्फे हे आवाहन करण्यात आलेले आहे. बँकामध्ये शभंर आणि त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटा उपलब्ध आहेत.
५०० आणि २००० चलनाच्या नव्या नोटा लवकरच बाजारात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम पाळावा व घरात अतिरक्त रक्कम जमा करुन ठेवू नये. तसेच ग्राहकांनी पैशाबाबत चिंता करु नये. बँकांच्या वारंवार फेऱ्या मारुन पैसे काढू नयेत. गरज असेल तेव्हाच पैसे काढावेत, आवश्यक तितकी रक्कम उपलब्ध आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
दोन हजार रुपयांची नवीन नोट आकाराने लहान आहे. ती एटीएम कॅसेट कॅलिबरेट करावी लागेल. प्रत्येक एटीएममध्ये जाऊन हा बदल करावा लागेल. सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी आणखी दहा ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. प्रत्येक एटीएममध्ये हा बदल करण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ लागेल. हे काम सोमवारपासून सुरु होईल. बाजारात सध्या १०० रुपयांच्या नोटांची आवश्यकता जास्त असल्यामुळे त्याच नोटा भरल्या जात आहेत.