अल्पसंख्याक समाज विरोधात गरळ ओकू नका - नरेंद्र मोदींची तंबी
By admin | Published: June 1, 2015 03:39 PM2015-06-01T15:39:21+5:302015-06-01T16:08:05+5:30
अल्पसंख्याकांच्या विरोधात टिप्पणी करण्याची गरज नसल्याचे आणि भारतीय घ़टना प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कट्टरतावादी
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ०१ - अल्पसंख्याकांच्या विरोधात टिप्पणी करण्याची गरज नसल्याचे आणि भारतीय घ़टना प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कट्टरतावादी हिंदुत्त्ववाद्यांना चपराक लगावल्याचे दिसत आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य असल्याचे सांगताना अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जाऊ नये असा स्पष्ट संदेश मोदी यांनी दिला आहे. हा संदेश संघपरीवाराला आहे की उठसूठ गरळ ओकणा-या ठराविक नेत्यांना आहे, याबाबत संदिग्धता आहे.
सध्याच्या सरकारने अच्छे दिन आणले असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. अर्थात काही लोक हे मान्य करायला नसल्याकडेही मोदी यांनी लश्र वेधले आहे.
कुठल्याही समाजाला खालच्या दर्जाची वागणूक दिल्यास ते सहन केले जाणार नाही असा स्पष्ट संदेश मोदी यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना, हा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नसल्याचा दावा परीवाराच्या पाठिराख्यांनी केला आहे.