८० आमदारांचा धाक दाखवू नका, तेजस्वी प्रकरणी स्पष्टीकरण द्या - जेडीयू

By admin | Published: July 14, 2017 08:59 PM2017-07-14T20:59:21+5:302017-07-14T20:59:21+5:30

आरजेडीने आपल्या ८० आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला आहे.

Do not show respect for 80 MLAs, clarify in bright case - JDU | ८० आमदारांचा धाक दाखवू नका, तेजस्वी प्रकरणी स्पष्टीकरण द्या - जेडीयू

८० आमदारांचा धाक दाखवू नका, तेजस्वी प्रकरणी स्पष्टीकरण द्या - जेडीयू

Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १४ -  बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) या सत्ताधारी महाआघाडीतील पक्षांमध्ये निर्माण झालेले मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आरजेडीने आपल्या ८० आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला आहे.  राष्ट्रीय जनता दलाचे बिहार अध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी आपल्या पक्षाकडे ८० आमदारांचे बळ असल्याचे वक्तव्य केले होते. 
जेडीयूचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते संजय सिंह म्हणाले, आरजेडीने आपल्या ८० आमदारांचा गर्व बाळगू नये. त्यांनी २०१०मधील आपली २२ आमदारांची संख्या लक्षात ठेवली पाहिजे. २०१५ साली आरजेडीच्या वाढलेल्या आमदारांच्या संख्येमध्ये नितीश कुमार यांच्या विश्वासार्ह चेहऱ्याचा मोठा हात होता हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधाल रेल्वेच्या हॉटेल घोटाळ्या प्रकरणी आरोप झाले असून, त्यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. 
अधिक वाचा
बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोन
लालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हा
मिशा नसताना मी भ्रष्टाचार कसा केला? तेजस्वी यादव
लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव
सध्या २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे ८०, संयुक्त जनता दलाचे ७१, काँग्रेसचे २७ आणि भाजपाचे ५३ आमदार आहेत.  दरम्यान, जेडीयू आणि आरजेडीमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मध्यस्थी केली आहे. बिहारमधील महागठबंधनचे सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. 
नितीश कुमारांनी या प्रकरणी कणखर भूमिका घेत तेजस्वी यादव संबंधी निर्णय घेण्यासाठी लालुंना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या सरकारची प्रतिमा स्वच्छ असावी असा नितीश कुमारांचा आग्रह आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी मंत्रिमंडळात राहू नये असे त्यांचे मत आहे. पण तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत अशी भूमिका राजदने घेतली आहे. त्यामुळे बिहारमधील जदयू-राजद-काँग्रेस महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे. 

Web Title: Do not show respect for 80 MLAs, clarify in bright case - JDU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.