शोभा डेंवर कारवाई करु नका, सुप्रीम कोर्टाचे विधानसभेला निर्देश
By Admin | Published: October 14, 2015 03:25 PM2015-10-14T15:25:39+5:302015-10-14T15:25:39+5:30
मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवण्याच्या निर्णयाविरोधात ट्विट करणा-या शोभा डे यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्याच्या विधानसभेला दिले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवण्याच्या निर्णयाविरोधात ट्विट करणा-या शोभा डे यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्याच्या विधानसभेला दिले आहे.
महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. फडणवीस सरकारच्या या निर्णयावर लेखिका शोभा डे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. फडणवीस सरकार हे हुकूमशाही वृत्तीचे असल्याचे ट्विट त्यांनी केले होते. या ट्विटनंतर शिवसेना आमदारांनी शोभा डे यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल केला होता. या हक्कभंगाविरोधात शोभा डे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. बुधवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शोभा डेंवर कारवाई न करण्याचे निर्देश दिल्याने डे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.