५००, १००० च्या नोटा असल्यास टेन्शन घेऊ नका
By Admin | Published: November 9, 2016 11:16 AM2016-11-09T11:16:15+5:302016-11-09T11:25:53+5:30
सामान्य लोकांची अडचण होऊ नये, त्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा ९, १०, ११ नोव्हेंबर रोजी म्हणजे ७२ तासांसाठी पुढील ठिकाणी स्वीकारल्या जातील.
>ऑनलाइन लोकमत
- सामान्य लोकांची अडचण होऊ नये, त्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा ९, १०, ११ नोव्हेंबर रोजी म्हणजे ७२ तासांसाठी पुढील ठिकाणी स्वीकारल्या जातील.
सरकारी बससेवेच्या तिकीट खिडक्या, विमान कंपन्यांचे तिकीट काउंटर, सरकारी रुग्णालये सरकारी कंपन्यांचे पेट्रोल, डिझेल व गॅस पंप, केंद्र, राज्य सरकार पुरस्कृत सहकारी ग्राहक संस्था, राज्य सरकारी दूध विक्री केंद्रे रेल्वेच्या तिकीट व आरक्षण खिडक्या स्मशान आणि दफनभूमी
- नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा त्यांच्या बँकेत जमा करून त्याबदल्यात दुसऱ्या नोटा घेण्यासाठी १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर अशी 50 दिवसांची मुदत असेल.
- ज्यांना या मुदतीत बँकेतून नोटा बदलून घेणे शक्य होणार नाही त्यांना कोणत्याही बँकेत, मुख्य किंवा सब पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखा कोणताही ओळख पटविणारा पुरावा दाखवून ३१ मार्च २०१७ पर्यंत या नोटा बदलून घेता येतील.
- ज्यांना काही कारणाने ३० डिसेंबरपर्यंतही वरीलप्रमाणे नोटा बदलून घेणे शक्य होणार नाही त्यांना ३१ मार्च २००१७ पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या विहित कार्यालयांत जाऊन त्या बदलून घेता येतील. मात्र त्या ठिकाणी त्यांना एक ‘डिक्लरेशन फॉर्म’ भरून द्यावा लागेल.